मुखेड : ACB Trap Nanded News | जिल्हा परिषदेमार्फत मिळणाऱ्या रमाई घरकुल योजनेचा ( Ramai Awas Yojana ) लाभ मिळवून देण्यासाठी महिला सरपंच आणि ग्रामसेवकाने 8 हजार रूपयाच्या लाचेची मागणी (Nanded Bribe Case) केली. त्यानंतर तडजोडी अंती 5 हजार रुपयांची लाच स्विकारून पळून जात असताना दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti Corruption Bureau Maharashtra) पथकाने अटक केली. त्यांच्याविरुद्ध मुखेड पोलिस ठाण्यात (Mukhed Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे मुखेड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
ज्योती खंडेराव पवार (Jyoti Khanderao Pawar) (40, पद – सरपंच, मौजे सलगरा (खुर्द), ता. मुखेड, जि. नांदेड) आणि शांताराम देविदास गवई (Shantaram Devidas Gavai) (52, पद – ग्रामसेवक, सलगरा (खुर्द), ता. मुखेड, जि. नांदेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपिचे नाव आहेत. (Women sarpanch, gram sevak arrested for taking bribe in Nanded district)
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्या आईच्या नावाने मुखेड तालुक्यातील सलगरा (खुर्द) येथे कच्चे घर असून, रमाई आवास योजने (Ramai Awas Yojana) अंतर्गत घरकुल योजनेचा लाभ मिळावा याकरिता तक्रारदार यांनी ग्रामपंचायतीमध्ये अर्ज केला होता. सरपंच ज्योती पवार यांनी प्रस्ताव मंजूर करण्यासाठी 5 हजार रूपये द्यावे लागतील असे सांगितले होते. तर जिल्हा परिषदेमध्ये प्रस्ताव सादर करण्यासाठी आठ हजार रुपये द्यावे लागेल, असे ग्रामसेवक गवई यांने सांगितले. (Women sarpanch gram sevak arrested for taking bribe in Nanded district)
दि. 13 मे 2023 रोजी पडताळणी कारवाई दरम्यान ज्योती पवार यांनी तक्रारदाराकडे लाच मागितली तर आरोपी शांताराम देविदास गवई यानेही लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. तक्रारदार हे लाच देण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात गेले असता त्यांना ज्योती पवार आणि शांताराम गवई हे भेटले नाहीत. तक्रारदार यांना गावातील पाईप लाईनचे कामावर बोलाविण्यात आले. त्यावेळी सरकारी पंचासमक्ष ज्योती पवार यांनी लाच घेतली. त्यानंतर त्या ग्रामसेवक शांताराम गवई यांच्याबरोबर मोटारसायकलवरून पळून जात होत्या. दबा धरून बसलेल्या अॅन्टी करप्शनच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.
नांदेड परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे (Nanded ACB SP Dr. Rajkumar Shinde), पोलिस उप अधीक्षक राजेंद्र पाटील (DySP Rajendra Patil) यांच्या मार्गदर्शनखाली पोलिस उपअधीक्षक अशोक इप्पर, पोलीस निरीक्षक स्वप्नाली धुतराज, पोलिस अंमलदार रितेश कुलथे, सय्यद खदीर, प्रकाश मामुलवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. (Women sarpanch, gram sevak arrested for taking bribe in Nanded district)