Gram Panchayat Election Results। पुण्यात विजयी उमेदवारापेक्षा ‘नोटा’ला मिळाली अधिक मते… तरीही उमेदवार विजयी घोषित

Gram Panchayat Election Results । : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आले. त्यात काहींना विजयाचा सुखद तर अनेकांना पराभवाचा धक्का बसला आहे. मात्र, पुण्याच्या भोर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत एक अचंबित करणारा निकाल लागला आहे. म्हाकोशी गावात विजयी उमेदवारापेक्षा ‘नोटा‘ला अधिक मते पडली. त्यामुळे निकाल काय येणार याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु, निवडणूक आयोगाच्या एका नियमानुसार दोन नंबरची मते मिळालेल्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात आले. (‘NOTA’ got more votes than the winning candidate in Pune)

पराभव होऊन ही विजयी ठरलेल्या या नशीबवान सदस्याचे रेखा विजय साळेकर (Rekha Vijay Salekar) असे नाव आहे. रेखा साळेकर यांना 43 मते मिळाली. तर त्यांच्या विरोधात नोटाला 104 मते पडली.  म्हाकोशी गावात प्रभाग क्रमांक एक मध्ये हा अचंबित करणारा निकाल लागला आहे. या प्रभागात सर्व साधारण महिलांसाठी दोन जागांचे आरक्षण पडले होते.  तिघांनी अर्ज दाखल केले आणि निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार दोन जागांसाठी निवडणूक असल्याने दोन नोटांचे पर्याय मतदारांसाठी देण्यात आले होते. (‘NOTA’ got more votes than the winning candidate in Pune)

काय झालं नेमक…

विजयासाठी तिन्ही उमेदवारांनी कंबर कसली होती. प्रचाराच्या तोफा थंड झाल्या आणि 340 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये कैद झाले. ( Gram Panchayat Election Results) तिन्ही उमेदवारांनी मतमोजणीला हजेरी लावली. संगीता तुपे  यांना 123 मतं मिळाली आणि दोन पैकी एका जागेवर त्यांचा विजय निश्चित झाला. त्यानंतर दुसऱ्या उमेदवाराच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.  मात्र निवडणूक निर्णय अधिकारी, मतमोजणी करणारे कर्मचारी, उर्वरित दोन उमेदवारांसह सगळं गाव बुचकळ्यात पडलं. कारण नोटाला 104 तर रेखा साळेकरांना 43 आणि कविता शेडगेंना 42 मतं पडली होती. अशा परिस्थितीत आता प्रभाग एक मधून दुसरी विजयी उमेदवार म्हणून कोणाच्या नावाची घोषणा होणार? की पुन्हा निवडणूक लागणार? असा प्रश्न सर्वांसमोर उभा ठाकला होता. (‘NOTA’ got more votes than the winning candidate in Pune)

म्हणून विजयी घोषित करण्यात आले…

 हा निकाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी राखून ठेवला. इतर ग्रामपंचायतींचे निकाल घोषित करण्यात आले. (Gram Panchayat Election Results) निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पाटलांनी म्हाकोशी गावातील राखून ठेवलेल्या निकालाकडे लक्ष केंद्रित केलं होतं. त्यांनी निवडणूक आयोगाची नियमावली हाती घेतली. यात 12 नोव्हेंबर 2013च्या अध्यादेशानुसार नोटा पर्यायाला मिळालेल्या मतांची संख्या लक्षात न घेता त्यानंतर ज्या उमेदवाराला सर्वाधिक मतं मिळाली ती विजयासाठी ग्राह्य धरावीत, असं सूचित केलेलं आहे. या नियमानुसार रेखा विजय साळेकरांना विजयी म्हणून घोषित करण्यात आलं. (‘NOTA’ got more votes than the winning candidate in Pune)

Local ad 1