Dry Day in Pune। कोरेगाव भीमा परिसरात दोन दिवस दारू विक्रीला बंदी
Koregaon Bhima : एक जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे (Koregaon Bhima) विजयस्तंभ अभिवादनासाठी मोठ्या प्रणाणत अनुयायी दाखल होतात. शौर्य दिनाच्या (pune) पार्श्वभूमीवर 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी या कालावधीत भीमा कोरेगाव आणि त्या परिसरातली गावात मद्य विक्रीवर बंदी (Dry Day in Pune) घालण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी घेतला आहे. (“Dry day” for two days in Koregaon Bhima area)
कोरेगाव भीमा गावात विजयस्तंभ शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी हजारो नागरिक एकत्र येत असतात. मोठ्या प्रमाणात गर्दी देखील होते. त्या पार्श्वभूमी अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठी खबरदारी घेतली जाते. त्यामुळे दारु विक्रीवर बंदी घालण्यात आली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. (“Dry day” for two days in Koregaon Bhima area)
शिक्रापूरसोबतच लोणीकंद पोलीस चौकीच्या हद्दीमध्ये असणारे देशी, विदेशी दारू, वाईन, बिअर, ताडी यासह मद्यविक्रीची दुकाने राहणार बंद (Dry Day in Pune) राहणार आहेत. या बंदीच्या नियमाचं उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिले आहेत. (“Dry day” for two days in Koregaon Bhima area)
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला तयारीचा आढावा..
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी विजयस्तंभ परिसरात नियोजनाशी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्या बैठकीत त्यांनी आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद, पीएमपीएमएल, अग्निशमन, विद्युत विभाग या विविध विभागांच्या नियोजनाचा आढावा घेतला होता. देशभरातील अनुयायी 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे अभिवादन करण्यासाठी येतात. त्यांना सोईसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक नियोजन करावे. त्यासाठी प्रत्येक विभागाने समन्वयक अधिकारी नेमावा. येणाऱ्या अनुयायांना कोणतीही समस्या येणार नाही, याची दक्षता घ्यावी आणि नियोजित वेळेत आवश्यक काम पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी दिले.जिल्हाधिकाऱ्यांनी वाहनतळ आणि इतर व्यवस्थेसंबंधी ठिकाणांना भेट देऊन तेथील तयारीचा आढावा घेतला होता.