Gautami Patil। हुल्लडबाजीमुळे गौतमी पाटीलला कार्यक्रम दहा मिनिटांतच करावा लागला बंद
नांदेड जिल्ह्यात पहिलाच कार्यक्रम होता
Gautami Patil । नांदेड : सध्या राज्यात गौतमी पाटीलचा कार्यक्रम प्रसिद्ध आहेत. ज्या ठिकाणी कार्यक्रम असेल त्याठिकाणी हुल्लडबाजी पहायाला मिळत आहे. नांदेड जिल्ह्यात गौतमी पाटीलचा पहिला कार्यक्रम (First program of Gautami Patil in Nanded district) होता. परंतु हुल्लडबाजामुळे हा कार्यक्रम दोन गाण्यानंतर बंद करावा लागला. हुल्लडबाजांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला. मात्र, पहाण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांचा हिरमोड झाला आहे. (Gautami Patil finished the program within ten minutes)
शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख आकाश रेड्डी (Shiv Sena’s Joint Communications Chief Akash Reddy)यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील धर्माबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानार शनिवारी रात्री गौतमी पाटीलच्या नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गौतमी पाटील येणार म्हणून कार्यक्रम स्थळी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. तर गौतमीला पाहण्यासाठी आलेल्या महिलांची संख्या देखील लक्षणीय होती. (Gautami Patil finished the program within ten minutes)
रात्री नऊ वाजता गौतमी पाटीलच स्टेजवर आगमन झाले. त्यावेळी स्टेज जवळ येताच तिच्या चाहत्यांनी गोंधळ सुरु केला. गौतमीला पाहण्यासाठी प्रेक्षकांनी लाकडी बॅरिकेट्स तोडून स्टेज जवळ आले होते. या प्रचंड गर्दीत ही गौतमी पाटीलने नृत्य सादर केले. मात्र, तिच्या चाहत्यांनी गोंधळ सुरु केला. एवढंच नाही तर खुर्च्यांची देखील तोडफोड केली. त्यामुळे कार्यक्रमात गोंधळ उडाला होता. हा गोंधळ पाहून गौतमी पाटीलला अवघ्या दहा मिनिटातच कार्यक्रम बंद करावा लागला. केवळ दीड गाण्यावर नृत्य सादर करुन तिने स्टेज सोडावा लागला. त्यामुळे ती ही नाराज झाल्याचे दिसून आले.
आयोजकांकडून प्रेक्षकांना शांत राहण्याचे आवाहन करण्यात आले. तरीही हुल्लडबाजांचा गोंधळ सुरूच होता. शेवटी गौतमी पाटील हिने स्वतः माईक ताबा घेत प्रेक्षकांना शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र, गोंधळ काही थांबला नाही. शेवटी गौतमी पाटीलने स्वतःहून कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला.