पुणे : राज्यातील ३ हजार ९१ पशुपालकांच्या बँक खात्यावर नुकसान भरपाई जमा
पुणे : राज्यात लम्पी चर्म रोगामुळे थैमान घातले होते. पुरेश्या प्रमाणात लसीकरण झाले आहे. लम्पीमुळे मृत्युमुखी पडलेल्या गोवंशीय पशुधनाच्या ३ हजार ९१ पशुपालकांच्या बँक खात्यांवर (Bank accounts) नुकसान भरपाई पोटी ८.०५ कोटी रक्कम जमा (8.05 crore amount deposited) करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह (Animal Husbandry Commissioner Sachindra Pratap Singh) यांनी दिली. (Financial assistance to cattle breeders whose livestock has died due to Lumpy)
राज्यामध्ये ऑक्टोबरअखेर ३३ जिल्ह्यांमधील एकूण ३ हजार २०४ गावांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण १ लाख ७२ हजार ५२८ बाधित पशुधनापैकी एकूण १ लाख १२ हजार ६८३ पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरित बाधित पशुधनावर उपचार सुरू आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकूण १४०.९७ लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण १३६.४८ लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे. (Financial assistance to cattle breeders whose livestock has died due to Lumpy)
Related Posts
जळगांव, अहमदनगर, धुळे, अकोला, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, वाशिम, जालना, हिंगोली, नंदुरबार आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेल्या लसीकरणानुसार महाराष्ट्रात सुमारे ९७.५४ टक्के गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले आहे.(Financial assistance to cattle breeders whose livestock has died due to Lumpy)
उर्वरित लसीकरण करुन घ्या..
क्षेत्रिय अधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय कृतीदलासमवेत झालेल्या दृकश्राव्य माध्यमाद्वारे आढावा बैठकीमध्ये लसीकरण न केलेल्या आणि लम्पी चर्मरोगाने बाधीत नसलेल्या गायींच्या कुठल्याही वयाच्या वासरांना, तसेच अद्यापही लसीकरण न झालेल्या गोवंशीय पशुधनास लसीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले. (Financial assistance to cattle breeders whose livestock has died due to Lumpy)