Farmer’s success story। मेकॅनिकल इंजिनिअर दीपक बनला प्रगतीशिल शेतकरी ; आधुनिक शेती करुन कमावतोय लाखो

Farmer’s success storyशेवगाव : घरच्यांची इच्छा होती मी मेकॅनिकल इंजिनिअरींचे शिक्षण घेऊन नोकरी करावी. त्यासाठी मी  मेकॅनिकल इंजिनिअरींगचे शिक्षण (Education in Mechanical Engineering) पूर्ण केले. परंतु, लहानपणापासून आई-वडिलांसोबत शेती करायची आवड लागली. परंतु त्यावेळी आम्हाला पारंपारीक शेती परवडत (Traditional farming is not affordable) नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे नोकरी न करता आधुनिक शेती करायचा निर्णय घेतला. त्यासाठी शेती आणि आधुनिक तंत्रज्ञान याचा अभ्यास केला. त्यानंतर शेतात वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली. अजूनही प्रयोग सुरु आहेत, हे सांगतोय  मेकॅनिकल इंजिनिअर असलेला दीपक लेंडाळ..  दीपक नोकरी न करता शेतीकडे कसा वळला हे जाणून घेऊया… (Deepak, a mechanical engineer, became a progressive farmer)

 
 
सध्या इंजिनिअरींगचे शिक्षण घेऊन वार्षिक लाखो रुपयांचे पॅकेज घेतात आणि महानगरांमध्ये स्थिरावतात. परंतु शेवगाव तालुक्यात एका तरुणाने मेकॅनिकल इंजिनिअरींचे शिक्षण पूर्ण केले. मात्र, त्यांने नोकरीच्या मागे न लागता. गावाकडे जाऊन आधुनिक शेती करायला सुरुवात केली. त्यामध्ये वेगवेगळे प्रयोग करत आता लाखो रुपये कमावत आहे. मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या दीपक अर्जून लेंडाळ (Mechanical Engineer Deepak Arjun Lendal)  रा. क-हेटाकळी, ता. शेवगाव, जि. अहमनगर (Shevgaon, Dist. Ahamnagar0  असे प्रगतीशिल शेतकऱ्याचे नाव आहे.
 
 
 

 

 दीपक गेल्या पाच ते सहा वर्षांपासून ताे ऋतुमानानुसार वेगवेगळी पिके घेतो. यावर्षी त्याने दीड एकरात टाेमॅटाेची लागवड केली आहे. त्यासाठी त्याने सुरवातीला शेत नांगरले व नंतर राेटा फिरवून त्याचे पाच फुट अंतर ठेवून बेड तयार केले. त्यावर शेणखत व काही प्रमाणात रासायनिक खताची मात्रा टाकली. त्यावर ठिबक अंथरून नंतर मल्चिंग पेपर अंथरला. त्या बेडवर दाेन फुटांच्या अंतरावर उन्हाळ्यात चालणारे सिजेंटा या टाेमॅटाे कंपनीच्या वाणाचे राेप १५ मार्च राेजी लावले. त्याला वेळोवेळी कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने (Advice from agricultural experts) कीटकनाशक, बुरशीनाशक फवारणी केली. यासाठी दीपकने इतकी धावपळ केली की दरम्यान त्याचे वजन दोन महिन्यात चार किलोने घटले.

 

A farmer's success story। मेकॅनिकल इंजिनिअर दीपक बनला प्रगतीशिल शेतकरी

 

राेपे माेठे झाल्यावर २५ दिवसांनी ते जमीनीवर पसरू नयेत यासाठी वरच्या बाजुला बांबुच्या साहयाने तार बांधून त्या तारेला टाेमॅटाेचे झाडांच्या फांद्या सुतळीने बांधल्या. ही पहिली बांधणी झाल्यावर दुसरी बांधणी अवघ्या १५ दिवसानंतर पुन्हा फांदयाची बांधणी केली. मात्र, यासाठी मोठ्या प्रमाणात मजुर लागते. आतापर्यंत त्याला यासाठी अडीच लाख रूपयांचा खर्च आला आहे. आता हे टाेमॅटाेचे पीक बहरात असून राेज शंभर ते दाेनशे क्रेट टाेमॅटाेचे पीक निघत आहे. दीपकचे वडील अर्जुन, आई मुक्ता, पत्नी वैष्णवी यांच्या साथीने ताे ही अत्याधुनिक शेती करत आहे.
 

आम्हांला गुगल न्यूजवर फाॅलो करण्यासाठी क्लिक करा

 

टाेमॅटाेच्या (Tomatoes) पीकातून सहा ते सात लाखांचे जवळपास ४० ते ५० टन टाेमॅटाेचे उत्पन्न निघेल, असा अंदाज आहे. शेतीमालाला भाव कसा मिळेल यावर नफा अवलंबून असते. याआधीदेखील मी अत्याधुनिक टरबूज, खरबूज, शिमला मिरची, दाेडके (Watermelon, Melon, Capsicum, Papaya०) याचे प्लॅंटची लागवड करून लाखाेंचे उत्पन्न काढले आहे. नवीन पीढीने नाेकरीच्या मागे न धाावता अत्याधुनिक शेती करावी. त्यासाठी आधी खर्चाची, कष्टाची तयारी ठेवावी लागते आणि पीकाला जीवापाड जपावे लागते, असे दीपक यांने सांगितले.
Local ad 1