...

(Strict adherence to curfew) संचारबंदी काटेकोर पाळू यात ः प्रमोद शेवाळे

नांदेड : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या संचारबंदीच्या आदेशाचे सर्वांनी पालन केले आहे. असेच सहकार्य यापुढेही अपेक्षित असून पोलीस गरजूंच्या मदतीला तत्पर आहेत, असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी व्यक्त केला आहे. (Strict adherence to curfew : Pramod Shewale)

नांदेड जिल्ह्यात गुरुवारी ( 25 मार्च) 3 हजार 981 नागरीकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील एक हजार 53 व्यक्तींचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. बुधवारी (24 मार्च) साईनगर नांदेड येथील 49 वर्षाच्या एका महिलेचा, धनेगाव नांदेड येथील 60 वर्षाच्या पुरुषाचा, गुरुवार 25 मार्च रोजी नायगाव तालुक्यातील कुटूंर येथील 48 वर्षाच्या पुरुषाचा, भंडारीनगर नांदेड येथील 65 वर्षाच्या पुरुषाचा, तरोडा नांदेड येथील 85 वर्षाच्या महिलेचा, लोहा तालुक्यातील सायाळ येथील 60 वर्षाच्या पुरुषाचा, होळी नावघाट नांदेड येथील 75 वर्षाच्या पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे व सोमवार 22 मार्च रोजी कंधार तालुक्यातील उमरज येथील 70 वर्षाच्या पुरुषाचा लोहा कोविड रुग्णालय येथे तर बुधवारी (24 मार्च) भावसार चौक नांदेड येथील 55 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 683 एवढी झाली आहे. (Strict adherence to curfew : Pramod Shewale)

जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 36 हजार 555 एवढी झाली असून यातील 27 हजार 328 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 8 हजार 311 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 93 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. (Strict adherence to curfew : Pramod Shewale)

Strict adherence to curfew
Strict adherence to curfew

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 17, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 441, धर्माबाद तालुक्यांतर्गत 2, कंधार तालुक्यांतर्गत 2, मुखेड कोविड रुग्णालय 6, नायगाव तालुक्यांतर्गत 4, माहूर तालुक्यांतर्गत 8, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 6, हदगाव कोविड रुग्णालय 14, किनवट कोविड रुग्णालय 8, बिलोली तालुक्यांतर्गत 4, उमरी तालुक्यांतर्गत 2, खाजगी रुग्णालय 35 असे एकूण 549 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.75 टक्के आहे. (Strict adherence to curfew : Pramod Shewale)

गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 9, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 40, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 20 एवढी आहे. (Strict adherence to curfew : Pramod Shewale)

Local ad 1