शेतकऱ्याने गांजा लागवडची मागितली परवानगी ; तर परवानगी मिळाल्याचे समजून करणार लागवड

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांने जिल्हाधिकाऱ्यांकडे केला अर्ज

सोलापूर | मला माझ्या मालकीच्या दोन एकर क्षेत्रफळ असलेल्या शेतात गांजा लागवडीची परवानगी द्यावी, (The farmer sought permission for cannabis cultivation) अन्यथा परवानगी मिळाली, (Cannabis cultivation) असे गृहीत धरुन मी गांजा लागवड करणार आहे, असा थेट इशारा सोलापूर जिल्हातील एका शेतकऱ्यांने जिल्हाधिकाऱ्यांना (Solapur collector) दिला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

 

सोलापूर जिल्ह्यातील शिरापूर (ता मोहळ) येथील अनिल आबाजी पाटील (Anil Abaji Patil from Shirapur (Ta Mohal) in Solapur district) असे गांजा लागवडीचा मागणी करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. जिल्हाधिकाऱ्यांना लिहलेल्या पत्रात पाटील म्हणतात, “मी शेतकरी असून, कोणतेही पिक घेतले तरी, त्याला शासनाचा हमी भाव मिळत नाही. शेती तोट्यात करावी लागत आहे. शेतीमालाला कवडीमोल भाव मिळत आहे. शेतीच्या मशागतीसाठी केलेला खर्चही निघत नाही. तसेच एखाद्या साखर कारखान्याला ऊस गाळपासाठी दिला असात त्याचे देखील बिल लवकर मिळत नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलो आहे”. (The farmer sought permission for cannabis cultivation)

 

“गांजाला चांगला भाव असून, त्यातून उत्पन्नही मिळू शकते. त्यामुळे जमीन गट नंबर 181/4 मध्ये माझ्या मालकीची दोन एकर जमिन असून, त्यामथ्ये गांजा लागवड करण्याची लेखी परवनागी 15 सप्टेंबरपर्यंत द्यावी, अन्यथा 16 सप्टेंबरला परवानगी मिळाली, असे गृहित धरुन मी गांजा लागवड करणार आहे. त्यानंतर माझ्यावर गुन्हा दाखल झाल्यास त्याला जिल्हा प्रशासन जबाबदार राहील, असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे  सोलापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. (The farmer sought permission for cannabis cultivation)

Local ad 1