गांजा सेवनाने शरीरावर काय दुष्परिणाम होतो ? जाणून घ्या..

Side effect : राज्यासह देशात गांजा उत्पादन आणि विक्रीवर पुर्णपणे बंदी असून, उत्पादन आणि विक्री करताना आढळल्यास अटक केली जाते. गांजा हा शरीरासाठी हानिकारक असून, शॉर्ट टर्म साईड इफेक्ट्स आणि लाँग टर्म साईड इफेक्ट्स, असे दोन प्रकारचे परिणाम आहेत. गांजाचे अतिसेवन करणे घातक आहे. (Effects of cannabis) शॉर्ट टर्म साईड इफेक्ट्स (Short-term side effects) हे गंजाचा नशा केल्यानंतर त्वरित होतात आणि गांजा शरीरात असेल तो पर्यंत राहतात. लाँग टर्म साईड इफेक्ट्स (LONG side effects) ही दीर्घकाळ गांजाच व्यसन केल्याने होतात. (Ganja side effect) त्यामुळे आपल्याकडे गांजी विक्री आणि उत्पादन यावर बंदी आहे. मात्र, बंदी असावी की, नसावी याविषयी मतमंतारे आहेत. तसेच बंदी आहे, हे जाणून घेऊया... 

ज्या पदार्थाच्या सेवनाने माणसाला विशिष्ट प्रकारची सुस्ती, नशा, तार किंवा धुंदी येते, अशा पदार्थांना मादक किंवा अंमली पदार्थ असे म्हणतात. गांजाचा समावेश अंमली पदार्थात केला जातो. गांजा या वनस्पतीचा स्त्री फुलोरा वाळवून टोकाच्या भागापासून गांजा मिळवतात व हातावर मळून तंबाखूबरोबर चिलिमीतून ओढतात.  (Effects of cannabis) चापट गांजा, गोल गांजा असे गांजाचे प्रकार आहेत. गांजा तयार केल्यानंतर राहिलेला केरकचरा ‘भांग’ म्हणून विकतात. भारतात एनडीपीएस कायद्यानुसार (नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्राफिक सबस्टन्सेस ऍक्ट 1985) नुसार गांजाचा वापर करणे, सेवन करणे, विक्री करणे, जवळ बाळगणे, वाहतूक करणे हा गुन्हा असून, राज्याच्या विविध भागात उत्पादन, वाहतूक, विक्री व बाळगल्या प्रकरणी अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

गांजाचे दुष्परिणाम खालील प्रमाणे आहेत

शॉर्ट टर्म साईड इफेक्ट्स :  (Short-term side effects) चिंता करणे आणि घाबरणे, लक्ष न लागणे. एकाग्रता कमी होणे. स्मृती (मेमोरी) खराब होणे. आठवण न राहणे. विचार करण्याचा क्षमतेत बदल होणे. वाहन चालविण्याचा क्षमतेवर असर होणे. रक्त दाब वाढणे. हृदयाची गती वाढणे (हृदविकाराचा झटका होण्याचे चान्सेस वाढणे). (Ganja side effect)  भूक वाढणे, मतिभ्रम (भास होणे) व स्वतःची भूल पडणे (आपण कोण आहे हे विसरून जाणे). (Effects of cannabis) 

 

लाँग टर्म साईड इफेक्ट्स (LONG side effects)  : कॅनॅबिनॉइड हायपेरेमेसिस सिंड्रोम, रोगप्रतिकार शक्ती कमी होणे, नैराश्य होणे, सेक्स लाईफ वर परिणाम – शुक्राणूंची संख्या कमी होणे, (sexual life side effects) इम्पोटेन्स, अधिक काळ नशा केल्याने किंवा वापरल्याने गांजा च व्यसन लागत, जे सोडण फार कठीण असते. बुद्ध्यांकात घट होणे (किशोरवयात गांजा व्यसन सुरू केलं तर आय. क्यू त ८ पॉइंट्स ने घट होते). शाळेत आणि अभ्यासात विद्यार्थ्याची कामगिरी कमी होते आणि कमी वयात शिक्षण सुटत. विचार दुर्बल होतात आणि जटिल कार्य करण्याची क्षमता कमी होते. विचार दुर्बल होतात आणि जटिल कार्य करण्याची क्षमता कमी होते. (Effects of cannabis)  आयुष्यात कमी समाधान मिळत. मधुमेह असेल तर गांजा व्यसनाचा त्यावर ही परिणाम होतो. ब्लड शुगर मेन्टेन होत नाही. मधुमेयचे परिणाम अधिक वाढतात. स्तनपान चा काळात जर माता गांजा व्यसन करत असेल तर त्याचा परिणाम बाळावर आणि त्याचा शारीरिक आणि मानसिक प्रगतीवर होतो. गर्भधारणेदरम्यान गांजा वापरणाऱ्या महिलांना नैराश्य, हायपरॅक्टिव्हिटी आणि दुर्लक्ष असलेली मुलं जन्माला येतात. फुफ्फुसाचे विकार होतात. (Ganja side effect)

शेतकऱ्याने गांजा लागवडची मागितली परवानगी ; तर परवानगी मिळाल्याचे समजून करणार लागवड

गांजाच्या दुष्परिणामांबद्दल मत मतांतरे

बंदीला विरोध : गांजामुळे इतर अंमली पदार्थांकडे वळण्याचे प्रमाण कमी होईल. तंबाखू सेवनाने एका वर्षात 70 लाखांहून अधिक लोक मरतात. मात्र तरीही तंबाखूवर बंदी नाही. गांजाच्या सेवनामुळे मृत्यू झाल्याचे उदाहरण नसतांना सुद्धा गांजावर बंदी हे तंबाखू लॉबीचे कारस्थान आहे. तसेच दारूमुळे झालेल्या मृत्यूशी देखिल तुलना केली जाते. बंदी असूनसुद्धा नार्कोटिक्स विभाग व अंमली पदार्थांचे व्यापारी, स्मगलर्स यांच्या संगनमताने भारतात सर्रास गांजा मिळतो. एक नगदी पीक जे शेतकऱ्यांना बरेचसे उत्पन्न मिळवून देऊ शकते, त्यापासून त्यांना वंचित ठेवले जाते. भारतात गांजाच्या परिणामावर फारसे संशोधन न होताच बंदी घातली गेली आहे. हे अन्यायकारक आहे. (Ganja side effect)

 

गांजावर बंदी का असली पाहिजे…

गांजा ही इतर अंमली पदार्थांच्या सेवनाची पहिली पायरी असू शकते. किंबहुना बऱ्याच केसेसमध्ये तसेच असते. गांजामुळे होणारे भ्रम-भास हे मेंदूला हानिकारक ठरतात, असे काही संशोधनात सिध्द झाले आहे.  अंमली पदार्थांवर बंदी असणे योग्य आहे. सिगारेट-दारूवर बंदी असावी पण गांजावरील बंदी उठवू नये. गांजा तंबाखूप्रमाणे प्रक्रिया करून मग सेवन करायचा नसतो, थेट वापरता येतो.  कायदेशीर परवानगी दिली तर मोठ्या प्रमाणात गांजा सेवन करणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढेल. देशासाठी मौल्यवान असणारे ‘मनुष्यतास’ गांजाच्या नशेत वाया जातील.  (Ganja side effect)

Local ad 1