डॉ.केशवराव धोंडगे यांच्या निधनाने मार्गदर्शक नेतृत्व गमावलो : अशोक चव्हाण

नांदेड : स्वातंत्र्यसेनानी व ज्येष्ठ नेते डॉ.भाई केशवराव धोंडगे यांचे निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक इतिहासाचे साक्षीदार असलेले संघर्षमय, प्रेरणादायी नेतृत्व हरपले आहे. त्यांचे संपूर्ण आयुष्य शेतकरी, कष्टकरी, गोरगरिबांसाठी समर्पित होते. गरजू, वंचित, शोषितांसाठी त्यांनी विधी मंडळापासून रस्त्यापर्यंत आक्रमक संघर्ष केला , अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी डॉ. भाई केशवराव धोंडगे यांना श्रद्धांजली वाहिली. (Dr. Keshavrao Dhondge’s death has lost a guiding leadership : Ashok Chavan)

 

ते एक अभ्यासू व निर्भीड लोकप्रतिनिधी होते. फर्ड्या वक्तृत्वाने त्यांनी विधानसभा व लोकसभा गाजवली. त्यांची भाषणे टोकदार, घणाघाती व जबरदस्त प्रहार करणारी असायची. वेळप्रसंगी देशाच्या पंतप्रधानांनाही खडे बोल सुनावणारे परखड व कणखर भाई खऱ्या अर्थाने ‘मन्याड खोऱ्याचा वाघ’ होते. (Dr. Keshavrao Dhondge’s death has lost a guiding leadership : Ashok Chavan)

 

भाई केशवराव धोंडगे: एक बुलंद आवाज हरपला !

डॉ. भाई केशवराव धोंडगे एक सर्वसमावेशक, विचारधारेशी कटीबद्ध, तत्वनिष्ठ, पुरोगामी, परिवर्तनवादी नेते होते. मराठवाड्यासह राज्याच्या अनेक प्रश्नांवर त्यांनी तळमळीने काम केले. शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेसाठी त्यांनी पुढाकार घेतला. कर्मकांड, अंधश्रद्धा मोडीत काढण्यासाठी त्यांनी पुस्तके व ‘जयक्रांती’च्या माध्यमातून विपुल लिखाण केले. (Dr. Keshavrao Dhondge’s death has lost a guiding leadership : Ashok Chavan)

 

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. केशवराव धोंडगे यांचे निधन

 

डॉ. भाई केशवराव धोंडगे व डॉ. शंकरराव चव्हाण यांचा वैचारिक संघर्ष होता. पण वैयक्तिक पातळीवर त्यांचे संबंध अतिशय चांगले होते. चव्हाण व धोंडगे परिवाराचे आजही सलोख्याचे संबंध आहेत. त्यांच्या निधनामुळे वडीलधारी, मार्गदर्शक नेतृत्व गमावल्याची भावना जाणवते. (Dr. Keshavrao Dhondge’s death has lost a guiding leadership : Ashok Chavan)
Local ad 1