देवेंद्रजी, महाविकास आघाडीच काम उत्तम चाललय  : अशोक चव्हाण

नांदेड : आमचं उत्तम चाललय, महाविकास आघाडीच काम उत्तम चाललं आहे, तुम्ही थोडं अ‍ॅडजेस्ट करुन घ्या असा टोला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Public Works Minister Ashok Chavan) यांनी लगावला आहे. (Devendraji Mahavikas Aghadi is working well: Ashok Chavan)

 

 

नायगांव तालुक्यातील कुटुंर येथे स्व. गंगाधरराव कुटुंरकर (Late. Gangadharrao Kutunkar) यांच्या प्रेरणास्थळाचा लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमात चव्हाण बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.  (Devendraji Mahavikas Aghadi is working well: Ashok Chavan)

 

 

महाराष्ट्रात सध्या सुरु असलेले पॉलिटीकल वॉर बंद झालं पाहिजे. दोन्हीकडच्या नेत्यांना विनंती आहे हा वॉर होऊ देऊ नका. राजकारणाचा जो स्तर घसरत चालला आहे, तो स्तर राखण्याचे काम सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष या दोघांनी केलं पाहिजे. हेच महाराष्ट्राच्या हिताचे होईल, अशी अपेक्षाही चव्हाण यांनी व्यक्त केली. (Devendraji Mahavikas Aghadi is working well: Ashok Chavan)

Local ad 1