ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

नांदेड : मराठवाड्यातील कंधार, लोहा, मुखेड या तीन तालुक्यांच्या सिमेवर असलेल्या डोंगराळ भागातील शेतकरी कष्टकऱ्यांचा लोकनेता म्हणून गणल्या गेलेल्या स्वातंत्र्यसेनानी केशवराव धोंडगे (Freedom fighter Keshavrao Dhondge) यांच्यावर आज बहाद्दरपुरा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत (Collector Abhijit Raut) यांनी शासनाच्यावतीने त्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (Senior leader Keshavrao Dhondge was cremated with state pomp)

स्वातंत्र्यसेनानी केशवराव धोंडगे यांना जिल्हा पोलीस दलाच्यावतीने बंदुकीच्या हवेत फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. केशवराव धोंडगे यांच्या अर्धांगिनी चंद्रप्रभावतीबाई धोंडगे यांच्याकडे पार्थिवावरील तिरंगा यथोचित सन्मानाने सुर्पूद करण्यात आला. ॲड मुक्तेश्वर धोंडगे, प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे या दोन सुपुत्रांसह त्यांच्या परिवारातील सर्व सदस्यांना यावेळी शोक अनावर झाला. (Senior leader Keshavrao Dhondge was cremated with state pomp)

यावेळी मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या शोकसंदेशाचे वाचन करण्यात आले. (Senior leader Keshavrao Dhondge was cremated with state pomp)

Senior leader Keshavrao Dhondge
Senior leader Keshavrao Dhondge

यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार विक्रम काळे, आमदार बाबासाहेब पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांताताई पाटील, माजी मंत्री कमलकिशोर कदम, माजी राज्यमंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर, माजी आमदार गुरुनाथराव कुरूडे, ईश्वराव भोसीकर, पाशा पटेल, ओमप्रकाश पोकर्णा, रोहिदास चव्हाण, शंकरअण्णा धोंडगे, ज्ञानोबा गायकवाड, हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. उद्धवराव भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (Senior leader Keshavrao Dhondge was cremated with state pomp)

Local ad 1