मुंबई Ration card update : सर्वसामान्य नागरिकांना शिधापत्रिका मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. त्यात तहसीलदार यांनी जारी केलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र (Certificate of Income) आवश्यक असते. मात्र, आता शिधापत्रिकेसाठी (Ration card) अर्जदाराने उत्पन्नाचे हमीपत्र (Guarantee of income) ग्राह्य धरले जाईल, असा निर्णय राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाने घेतला. (Getting ration card will be easier now)
राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने 15 सप्टेंबर यासंदर्बातील आदेश जारी केला आहे. केंद्र शासनाच्या 2014 मधील अन्नसुरक्षा धोरणाच्या अनुषंगाने हा आदेश काढण्यात आला आहे. (Getting ration card will be easier now)
१) Cut off Date बाबतचे संदर्भाधीन दि. १३.१०.२०१६, दि. २१.५.२०१८ (हमीपत्रासह), दि. ६.७.२०१९ चा शासन निर्णय याद्वारे रद्द करण्यात येत आहे.
२) विभक्त शिधापत्रिकांची मागणी करणान्या विद्यमान अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी कुटुंबाची शिधापत्रिका धारण करणाऱ्या तसेच, सद्यस्थितीत शिधापत्रिका धारण करीत असलेल्या परंतु, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत पात्र लाभार्थी म्हणून समाविष्ट नसलेल्या सर्व शिधापत्रिकाधारकांनी वार्षिक कौटुंबिक उत्पन्नाबाबतचे या शासन निर्णयासोबतच्या नमुन्यातील हमीपत्र सक्षम प्राधिकान्याकडे सादर करणे अनिवार्य राहील.
३) नव्याने शिधापत्रिकेची मागणी करुन राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत पात्र लाभार्थी म्हणून समाविष्ट होऊ इच्छिणाऱ्या सर्व नागरिकांनीदेखील वार्षिक कौटुंबिक उत्पन्नाबाबतचे या शासन निर्णयासोबतच्या नमुन्यातील हमीपत्र सक्षम प्राधिकाऱ्याकडे सादर करणे अनिवार्य राहील. (Getting ration card will be easier now)
४) क्षेत्रीय कार्यालयास अंतिमतः देण्यात आलेल्या इष्टांकाच्या मर्यादेत वेळोवेळी उपलब्ध असलेल्य शिधापत्रिकाधारकांमधून लागू असलेल्या विद्यमान निकषांनुसार त्या शिधापत्रिकाधारकास राष्ट्री अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत पात्र लाभार्थी म्हणून समाविष्ट करण्यात यावे. शिधापत्रि संगणकीकरणाचा तांत्रिक कालावधी विचारात घेऊन तद्नंतर त्या शिधापत्रिकाधारक सवलतीच्या दरातील अन्नधान्याचा लाभ देण्याबाबत कार्यवाही करावी.
5) संदर्भाधीन सर्व शासन निर्णयान्वये पात्र लाभार्थ्यांची निवड करण्याकरिता दिलेल्या इतर सूचना कायम राहतील..