सीतरंग चक्रीवादळाचा वेग वाढणार, महाराष्ट्राला चक्रीवादळाचा धोका असेल का ?

Cyclone Sitarang । बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाला सितरंग (Cyclone Sitarang) असे नाव देण्यात आले असून, आज रविवारी सकाळी चक्रीवादळ वेग धारण केला आहे.. उद्या सोमवारी याचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होणार असल्याचा इशारा वहामान विभागाने (Department of Aviation) दिला आहे. दरम्यान, किनारपट्ट्याना सतर्क रहाण्याच्या सूचना ही केल्या आहेत.(Cyclone Sitarang will increase in speed)

बंगालच्या उपसागराच्या पूर्वमध्य भागात 22 रोजी शनिवारी कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. शनिवारी रात्री त्याचा वेग ताशी 60 ते 70 किमी इतका असून, आज रविवारी 22 रोजी सकाळीच त्याचे चक्रीवादळात (Cyclone Sitarang) रुपांतर झाले. उद्या सोमवारी 23 रोजी त्याचा वेग तशी 110 किमी राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. (Cyclone Sitarang will increase in speed)

हवामान विभागाने जाहीर केल्याप्रमाणे चक्रीवादळाचा (Cyclone Sitarang) महाराष्ट्रात परिमाण होणार नाही. चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात राहणार ते भारतीय किनार पट्ट्यात धडकणार नाही असा अंदाज आहे. मात्र या भागात जोरदार पाऊस पडेल. (Cyclone Sitarang will increase in speed)

Local ad 1