...

क्रिस जॉली यांनी पुण्यात शिक्षकांना दिली प्रेरणा ; प्रारंभिक साक्षरता आणि फॉनिक्स शिक्षणाची गरज अधोरेखित

पुणे, जॉली लर्निंगचे संस्थापक आणि जागतिक स्तरावर प्रसिद्ध Jolly Phonics कार्यक्रमाचे प्रकाशक क्रिस जॉली यांनी आपल्या भारत दौऱ्याचा एक भाग म्हणून पुण्यातील Victorious Kidss Educares शाळेला भेट दिली. प्राथमिक साक्षरता आणि फॉनिक्स आधारित शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित या भेटीत त्यांनी शिक्षक, प्रशिक्षक आणि शाळा नेत्यांसोबत सखोल चर्चा केली. सत्र दरम्यान क्रिस जॉली यांनी भारताच्या शिक्षण व्यवस्थेत संरचित फॉनिक्स प्रशिक्षणाच्या तातडीच्या गरजेवर भर दिला. त्यांनी स्पष्ट केले की सिंथेटिक फॉनिक्स ही संशोधनावर आधारित आणि सिद्ध पद्धत असून, लहान मुलांना वाचन व लेखन शिकवण्याची ती अत्यंत परिणामकारक पद्धत आहे.

 

स्वतःच्या अनुभवाचा उल्लेख करताना ते म्हणाले, “जेव्हा मी Jolly Phonics सुरू केले, तेव्हा यूकेमधील वाचनाचे मानक घसरत होते. आम्हाला लक्षात आले की खरा उपाय हा चांगल्या साहित्याबरोबरच उत्तम पद्धतीत आहे, अशी पद्धत जी मुलांना ध्वनी-अक्षर संबंध शिकवते व शब्दांची बांधणी सहज करते. भारतालाही आता अशीच मजबूत साक्षरतेची पायाभरणी करण्याची संधी आहे.”

 

भारतामध्ये इंग्रजी भाषेचा वाढता स्वीकार, बदलत्या शिक्षणपद्धती आणि शिक्षकांची तयारी या गोष्टी फॉनिक्स आधारित शिक्षणाला अनुकूल ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. तमिळनाडू, नागालँड आणि लडाखमध्ये Jolly Phonics चा यशस्वी अवलंब झाल्याचे सांगत त्यांनी देशभरातील विस्ताराबद्दल आशावाद व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, “बदल हा कायद्याने नव्हे, तर प्रेरणा आणि प्रशिक्षणामुळे घडतो. प्रशिक्षित शिक्षक फॉनिक्स प्रभावीपणे शिकवतात, तेव्हा कोणत्याही पार्श्वभूमीतील मुले प्रवाहीपणे वाचू-लिहू लागतात.”

 

शिक्षणात तंत्रज्ञानाची वाढती भूमिका त्यांनी मान्य केली, परंतु डिजिटल साधनांसोबत हातांनी शिकण्याचे (tactile learning) महत्त्वही तेवढेच असल्याचे त्यांनी सांगितले. Jolly Classroom Programme आणि Jolly Phonics Lessons App या डिजिटल साधनांद्वारे पारंपरिक आणि डिजिटल शिक्षणाचा संतुलित वापर शक्य असल्याचे जॉली यांनी नमूद केले. जागतिक साक्षरतेच्या समस्यांचा उल्लेख करताना त्यांनी म्हटले की जगभरात फॉनिक्सवर चर्चा होत असली, तरी आता अमलबजावणीवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. मुलांच्या वाचन क्षमतेनुसार तयार करण्यात येणाऱ्या *decodable readers* पुस्तकांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

 

भेटीच्या शेवटी त्यांनी आपले ध्येय पुन्हा अधोरेखित केले. “प्रत्येक शाळेतील प्रत्येक मुलाला लहान वयात आत्मविश्वासाने वाचता आणि लिहिता यावे, हेच आमचे उद्दिष्ट आहे. आयुष्यभराच्या शिक्षणाची पायाभरणी ही सशक्त साक्षरतेतूनच होते, आणि त्यासाठी फॉनिक्स हा सर्वात प्रभावी मार्ग आहे.” OBE (Order of the British Empire) सन्मानाने गौरवलेले आणि शिक्षण क्षेत्रातील तीन दशकांहून अधिक अनुभव असलेले क्रिस जॉली जगभरातील शिक्षकांना प्रेरणा देत आहेत. पुण्यातील Victorious Kidss Educares येथील त्यांचा दौरा शिक्षक सक्षमीकरण आणि बालसाक्षरता वाढविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना अधिक बळ देणारा ठरला.

 

Jolly Learning Ltd विषयी
यूकेस्थित Jolly Learning Ltd ही शैक्षणिक प्रकाशन संस्था Jolly Phonics, Jolly Grammar आणि Jolly Music या कार्यक्रमांसाठी ओळखली जाते. १०० हून अधिक देशांमध्ये आनंददायी, पद्धतशीर आणि बहु-संवेदी शिक्षण पद्धतीद्वारे साक्षरतेत बदल घडविण्यात या संस्थेचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

 

Local ad 1