रायलसीमा एक्सप्रेससह (Express) रेल्वेचे अन्य प्रश्न लागणार मार्गी

खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी घेतली दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन माल्या यांची भेट

नांदेड : राज्य राणी एक्सप्रेसचे (Rajya rani Express) 7 डब्बे नाशिकला उघडत असे ज्यामुळे नांदेड ते नाशिक या अंतरात या डब्यानाचा काहीही उपयोग होत नाही. नाशिकला उघडणारे डब्बे नांदेड येथे उघडावेत व नाशिक पर्यंत प्रवाशांना त्या डब्यातून प्रवास करत यावा, अशी मागणी खा प्रतापराव पाटील चिखलीकर (mp pratap patil chikhalikar) यांनी केली. त्यावर दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन माल्या यांनी कार्यवाही केली जाईल, असे अश्वासन दिले. त्यामुळे नांदेड ते नाशिकपर्यंतचा प्रवास सुखकर होणार आहे. (Other railway issues, including the Rayalaseema Express, will be addressed)

 

दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन माल्या यांच्याशी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासोबत असलेल्या शिष्टमंडळांने चर्चा केली. यावेळी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासही रेल्वे संघर्ष समितीचे (marathwada railway sangharsh samiti) शंतनु डोईफोडे, अरुण मेघराज, हर्षद शहा, उमाकांत जोशी, किरण चिद्रावार, गंगाधर जोशी आदिंची उपस्थिती होती.

 

नांदेड-बिदर मार्गाचे (Nanded- bidar railway line) काम सुरु करण्याच्या अनुशंगाने आमचे प्रयत्न सुरु आहेत, लवकरच या समस्या सुटतील असा विश्वास खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला आहे. तिरुपती-निझामाबाद सुपरफास्ट (Tirupati nizamabad super express) ही रायलसीमा एक्सप्रेस (Rajya rani Express) नांदेड पर्यंत सोडावी, अशी मागणी केली. यासाठी आपण रेल्वे बोर्डाशी चर्चा करु, नविन वेळापत्रक तयार करण्यात येईल आणि लवकरच ही गाडी नांदेड पर्यंत सुरु करण्यात येईल, अशी माहिती दिली आहे.

 

नांदेड – बिदर नव्या (Nanded- bidar railway line) रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली असली तरी कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली नाही. त्यामुळे या कामाला लवकर सुरुवात करावी. हुजुर साहिब सचखंड गुरुदवारा हा आंतरराष्ट्रीय किर्तीचा असल्याने नांदेड येथील रेल्वे स्टेशनवर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध कराव्यात, मराठवाडा एक्सप्रेसला (Marathwada express) दोन वातानुकुलीत डब्बे जोडावेत, वर्धा- यवतमाळ- नांदेड रेल्वे मार्गासाठी निधी उपल्ब्ध असुनही कामाला गती नाही त्यामुळे या कामाला गती देण्याच्या मागणीसह अनेक मागण्या खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केल्या.

Local ad 1