रूबी हॉल क्लिनिकमध्ये जागतिक रक्तदाता दिवस साजरा

पुणे : जागतिक रक्तदाता दिवसाचे (वर्ल्ड ब्लड डोनर डे) चे औचित्य साधून रूबी हॉल क्लिनिकमध्ये ( Ruby Hall Clinic) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी रूबी हॉल क्लिनिकचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. पी. के. ग्रांट (Managing Trustee of Ruby Hall Clinic Dr. P. K. Grant), मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोट, मुख्य कामकाज अधिकारी डॉ. मनिषा करमरकर, वैद्यकीय संचालक डॉ.रिबेका जॉन, डॉ.स्नेहल मुुजुमदार यांसह 250 हून अधिक रक्तदाते, रक्तदान शिबिरांचे आयोजक, कन्सल्टंट डॉक्टर्स, परिचारिका आणि रूबी हॉल क्लिनिकच्या तीनही शाखांमधील कर्मचारी सहभागी झाले होते. (Celebrate World Blood Donor Day at Ruby Hall Clinic)

 

 

या कार्यक्रमात 20 रक्तदाते आणि रक्तदान शिंबिरांचे आयोजक यांचा सत्कार करण्यात आला.त्याचबरोबर सुरक्षित रक्तसंक्रमणाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी डॉक्टर्स आणि परिचारिकांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.त्यापैकी 124 विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.

 

 

 

रूबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोट म्हणाले की, रूबी हॉल क्लिनिकमधील रक्तसंकलन केंद्रामध्ये तांत्रिकदृष्ट्या सर्व प्रगत उपकरणे आहेत. आमचे रक्तसंकलन केंद्र हा आमच्या रूग्णालयाचा पाया आहे आणि रक्तदाते हेच आमची बलस्थान आहेत. याप्रसंगी बोमी भोट यांनी ब्लड सेंटरमधील कर्मचार्यांचे त्यांची वचनबध्दता आणि कौशल्याबद्दल कौतुक केले. ब्लड ट्रान्सफ्युजन सर्व्हिसेसच्या संचालिका डॉ. स्नेहल मुजुमदार यांनी प्रस्थापित केलेल्या प्रोटोकॉल्सची त्यांनी प्रशंसा केली. हे प्रोटोकॉल्स कर्मचारी काटेकोरपणे पालन करत असल्याने रूग्णांमध्ये सुरक्षित रक्तसंक्रमण होते.
रूबी हॉल क्लिनिकचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ.परवेझ ग्रांट म्हणाले की, लोकं रक्तदानासाठी पुढे येत नाहीत यासाठी वेळेचा अभाव,लोकांमध्ये असलेली भीती आणि यात कुठल्या गोष्टी समाविष्ट असतात हे माहित नाही,ही कारणे दिली जातात. एक वैद्यकीय संस्था म्हणून याच्याशी निगडीत सर्व गैरसमज दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यासाठीच रक्तदान व सुरक्षित रक्तसंक्रमण याबाबत जागरूकता वाढावी म्हणून कार्यक्रमाचे आयोजन आम्ही केले.

 

 

 

रूबी हॉल क्लिनिकमधील रक्त केंद्र संचालिका डॉ. स्नेहल मुुजुमदार म्हणाल्या की, रूबी हॉल क्लिनिकमध्ये संकलित केलेले रक्त हे 100 टक्के स्वैच्छिक दात्यांनी दिलेले असते आणि रूग्णांना देण्यात येणारे रक्त हे 100 टक्के रक्तघटकांच्या स्वरूपात असते. रक्तगट वर्गीकरण, दाता आणि रूग्णाचे रक्तगट जुळवणे, एचआयव्ही व इतर आजारांसाठी रक्ताची तपासणी या सर्व प्रक्रिया ऑटोमेशन किंवा सेमी ऑटोमेशन पध्दतीने केल्या जातात. याशिवाय ल्युकोडिप्लेशन, इरॅडिएशन व अफेरेसिस यासारख्या अद्ययावत सुविधांमुळे आमच्या येथील रक्त संक्रमण सुरक्षित आहे

Local ad 1