धक्कादायक : झिका विषाणुचा (zika virus) पहिला रुग्ण पुणे जिल्ह्यात आढळला

MH Times news network : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नाही, तेच पुणे जिल्ह्यात धक्कादयक माहिती समोर आली आली. केरळमध्ये आढळणाऱ्या झिका विषाणुची लागण झालेला राज्यातील पहिला रुग्ण पुणे जिल्ह्यातील पुरंदर ताललुक्यात असलेल्या बेलसर येथे आढळला आहे. (Belsar Purandar Taluka in Pune District) त्यामुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. एका 50 वर्षीय महिलेला झिकाची विषाणुची लागण झाल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली आहे. (Maharashtra Reports First Case Of Zika Virus Woman in Pune Tests Positive)

 

पुणे जिल्ह्यातील बेलसर गावात झिका विषाणूचा आढळल्याने त्यामुळे परिसरातील पाच किलोमीटर मधील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या स्थितीला हवामान हवामान बदलामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया त्याचबरोबर इतर साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. बेलसरमध्ये मागील एक ते दिड महिन्यापासून डेंग्यू चिकनगुनिया आणि इतर साथीच्या रोगांनी थैमान घातले होते. त्याच अनुषंगाने एनआयव्ही (National Institute of Virology) पुणे बेलसर (ता.पुरंदर) मधील 51 नमुने गोळा करून ते तपासणीसाठी घेतले होते. त्यामध्ये प्रमुख्याने झिका विषाणूचा एक रुग्ण असल्याचा अहवाल एनआयव्ही शुक्रवारी राज्य शासनाला कळवले. तसेच 25 चिकनगुनिया 3 डेग्यू चे रुग्ण आढळून आल आहेत. (Maharashtra Reports First Case Of Zika Virus Woman in Pune Tests Positive)

 

राज्य शासनाने जिल्हा परिषद प्रशासनाला बेलसर गावात उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्यकार्याकारी अधिकारी आयुष प्रसाद, राज्य साथरोग प्रमुख डाॅ. प्रदीप आवटे, जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे. (Maharashtra Reports First Case Of Zika Virus Woman in Pune Tests Positive)

Local ad 1