भाजप नांदेड जिल्हाध्यक्षांची निवड ; कंदकुर्ते, भोयर, हंबर्डे यांची निवड

नांदेड : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चेंद्रशेखर बावनकुळे (State President of Bharatiya Janata Party Chandrasekhar Bawankule) यांनी राज्यातील जिल्हा आणि शहराध्यक्षांची नियुक्ती घोषित केली आहे. त्यात नांदेड जिल्ह्यात दक्षिण- उत्तर (South-North in Nanded District) अशी विभागणी करुन दोन अध्यक्षांची नियुक्ती जाहीर केली आहे. (BJP Nanded District President ; Appointment of Kundkurte, Bhoyer, Humbarde)

 

 

आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका (Lok Sabha, Vidhan Sabha and Local Self-Government Elections) होणार आहेत. त्यादृष्टीने भाजपने तयारी सुरु केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा अध्यक्षांची निवीन नियुक्ती करुन खांदेपालट करतील, अशी चर्ची सुरु होती. त्यात राज्यात राजकीय उलथापलथ झाली. त्यामुळे नियुक्या रखडल्या होत्या.

 

 

नांदेड जिल्हा अध्यक्ष नियुक्त करताना दोन भाग पाडण्यात आले आहेत. त्यात नांदेड उत्तर (जिल्हा) अध्यक्षपदी सुधाकर शामराव भोयर (Nanded North (District) President Sudhakar Shamrao Bhoyer) आणि नांदेड दक्षिण संतुकराव मारोतराव हंबर्डे (Nanded South Santukrao Marotrao Humbarde) यांची नियुक्ती करण्यात आली. तर नांदेड शहर अध्यक्षपदी दिलीप व्यंकटराव कंदकुर्ते (Nanded City President Dilip Venkatarao Kandakurte) यांनी नियुक्ती बावनकुळे यांनी जाहीर केली आहे.

Local ad 1