पीक नुकसान मदत वाटपाच्या रक्कमेतून वसुली करू नका ; बँकांना आदेश

नांदेड : पावसाची उघडीप आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून, राज्य शासनाकडून मिळणाऱ्या मदतीतून बँकां कर्जाचे हप्ते कापून कर्जाची वसुली करत आहेत. त्यामुळे कोणतीही कपात न होता, रक्कम शेतकऱ्यांना मिळावी, अशी मागणी होत होती. त्यावर बँकांनी कोणतीही कपात न करता, रक्कम शेतकऱ्यांना द्या, असे आदेश जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. मुकेश बारहाते यांनी यांनी दिले आहे. (Do not recover from crop damage aid allocation amounts; Orders to banks)

 

 

राज्य सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे शासन परिपत्रकान्वये गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी शासनाकडून वाटप केलेली मदतीची रक्कम खातेदारांच्या खात्यावर जमा करताना मदतीच्या रकमेतून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली न करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. (Do not recover from crop damage aid allocation amounts; Orders to banks)

जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत, व्यापारी, ग्रामीण तसेच सहकारी बँकांनी परिपत्रकात दिलेल्या सूचनेनुसार शासनाकडून पिकांच्या नुकसानीसाठी वाटप केलेल्या रक्कमेसंबंधित खातेदारांच्या बँक खात्यावर जमा करताना मदतीच्या रकमेतून कोणत्याही प्रकारची वसूली करु नये, तसेच शासन परिपत्रकाची अंमलबजावणी कटाक्षाने करावे, अस आवाहन डॉ. बारहाते यांनी केले आहे. (Do not recover from crop damage aid allocation amounts; Orders to banks)

Local ad 1