Bees attack । सिंहगडावर मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला

पुणे : रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी सिंहगडावर पर्यटक मोठ्या प्रमाणात जातात. रविवारी पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला असून, त्यात दोन पर्यटक जखमी झाल्याची माहिती समोर आली. (Bees attack tourists visiting Sinhagad fort)

 

Talathi Recruitment 2023 । तलाठी भरती संदर्भात मोठी अपडेट ; परिक्षा कधी होणार ?

 

रविवारची सुट्टी असल्याने सकाळपासूनच सिंहगडावर पर्यटकांनी गर्दी केली होती. वाहनतळ पूर्ण भरून घाट रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गाडी तळापासून पुणे दरवाजापर्यंत आणि गडावरील पायवाटांवर पर्यटक चालत होते. तेवढ्यात टिळक बंगल्याजवळ असलेल्या तोफेच्या पॉईंट परिसरात अनेक पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला. (Tourists were attacked by bees)

 

 

पर्यटकांच्या सुरक्षेबाबत वन विभागाने योग्य खबरदारी घेतली नसल्याचा आरोप पर्यटकांनी केला. यात सुमारे ५९ पर्यटक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. सिंहगडावर सुट्टीच्या दिवशी सरासरी पाच ते दहा हजार पर्यटक येतात. मधमाशांचा हल्ला, दरड कोसळणे किंवा इतर दुर्घटना घडतात. त्यानंतर आपत्कालीन परिस्थितीत पर्यटकांचा जीव वाचवण्यासाठी कोणतीही व्यवस्था सिंहगडावर नसल्याने नाराजी व्यक्त केली. जखमींना त्वरित उपचारांसाठी घेऊन जाण्यासाठी साधी रुग्णवाहिकाही उपलब्ध नसते. (Bees attack tourists visiting Sinhagad fort)

Local ad 1