Bank Strike। बँकांतील कामे आजच पूर्ण करा.. उद्या बँकांचे देशव्यापी संप

Bank Strike । बँकांनी देशव्यापी संप (Bank Strike) पुकारला असून, उद्या 19 नोव्हेंबर संपावर जाणार आहेत. देशव्यापी संपामुळे बँकेच्या ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या दरम्यान देशभरात बँकिंग सेवा ठप्प होऊ शकतात, त्यामुळे ग्राहकांनी आपली सर्व महत्त्वाची कामे आजच आटोपून घ्यावी, जेणेकरुन त्यांना कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवणार नाही. (Bank strike news। Nationwide strike of banks tomorrow)

 

ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) ने कॅथोलिक सीरियन बँक आणि डीबीएस बँकेच्या कर्मचार्‍यांना 11 व्या द्विपक्षीय वेतन सुधारणा नाकारण्यासह कायमस्वरुपी नोकऱ्यांचे आऊटसोर्सिंग (कॅश मूव्हमेंट जॉब आणि हाऊसकीपिंग जॉब) आणि काही बँकांमधील नोकरीच्या सुरक्षिततेला धोका यासह अनेक मुद्द्यांच्या निषेधार्थ उद्या शनिवारी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. (Bank strike news। Nationwide strike of banks tomorrow)

 

 

दरम्यान,केंद्र सरकारने IBA आणि बँक युनियनला 16 नोव्हेंबर रोजी चर्चा सुरु करुन संप टाळण्यासाठी तोडगा काढण्याचे निर्देश दिले होते. दिल्लीत सीएलसी रामिस थिरु यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या सलोखा बैठकीत हे निर्देश देण्यात आले होते. परंतु कोणताही तोडगा न निघाल्याने उद्या बँकांचा देशव्यापी संप होणार असल्याचे सांगण्यात आले. (Bank strike news। Nationwide strike of banks tomorrow)

 

ऑनलाईन बँकिंग सुरु राहणार
बँकेचे देशव्यापी संप असलेतरी ग्राहक ऑनलाईन सेवांचा लाभ घेऊ शकतात. त्यामुळे ग्राहकांना काळजी करण्याचे कारण नाही. संप काळात ग्राहक नेट बँकिंगसह सर्व प्रकारच्या ऑनलाईन बँकिंग सुविधांचा लाभ घेऊ शकता, असे बँकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (Bank strike news। Nationwide strike of banks tomorrow)

 

Web Title ः Bank strike news।Nationwide strike of banks tomorrow

Local ad 1