Badli Marathi News : शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ

Badli Marathi News । : राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या सर्वसाधारण बदल्या (General Transfer) ह्या एप्रिल ते मे महिन्यात होत असतात. त्यामुळे 31 रोजी आपल्या बदलीचा आदेश येईल, अशी धाकधुक होती. परंतु मात्र राज्य सरकारने या सर्वसाधारण बदलाबाबत 30 जून 2023 पर्यंत मुदत वाढ देण्याचा (The state government has extended the deadline for transfers) निर्णय घेतला आहे. त्यामुळे आजच टेन्शन उद्यावर गेले आहे. परंतु बदलीची टांगती तलवार कायम आहे. (Badli Marathi News : Extension of time for transfers of officers till June 30)

 

 

Gazetted Officer Non Gazetted। राज्यातील 74 राजपत्रित-अराजपत्रित नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती

 

गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे बदल्यांना स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या प्रमाणात नियमित बदलीसाठी पात्र आहे. मात्र, शासन एकूण बदल्यांपैकी 12 ते 15 टक्के बदल्या करत असते. राज्यात आतापर्यंत गृह विभागातील बदल्या पूर्ण झाल्या असून, काही किरकोळ बदल्या होऊ शकतात. तसेच महसूल विभागातील आणि सनदी अधिकाऱ्यांच्या काही प्रमाणात बदल्या झाल्या आहेत. नुकतेच 74 नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती (Promotion of 74 Naib Tehsildars as Tehsildars) देऊन बदल्या केल्या. तसेच अतिवरिष्ठ 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजूनही दुसऱ्या टप्प्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत.

Lok Sabha elections 2024 । जिल्हा प्रशासन लागलं लोकसभा निवडणुकीच्या तयारीला : मतदार यादीतील आपले नाव तपासून घ्या !

 

राज सरकारने सर्वसाधारण बदल्यांसाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली असल्याने आता उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे. तसेच काही तहसीलदांराच्या झालेल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या ही बदल्याचे आदेश येण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. (Badli Marathi News : Extension of time for transfers of officers till June 30)

Local ad 1