...

पुणे उत्पादन शुल्क अधीक्षकपदी अतुल कानडे यांची नियुक्ती

राज्य उत्पादन शुल्क विभागातील गट-अ संवर्गातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

PUNE . महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्य उत्पादन शुल्क विभागातील गट-अ संवर्गातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश नुकतेच निर्गमित केले आहेत. या आदेशानुसार, नांदेडचे अधीक्षक अतुल कानडे यांची बदली पुणे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक म्हणून करण्यात आली. त्यांनी पदभार नुकतेच स्विकारले. संपूर्ण राज्यभरात आठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहे. शासन आदेश ३० मे २०२५ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की, कोणत्याही स्वरूपाची रजा शासनाच्या पूर्वपरवानगी शिवाय मंजूर केली जाणार नाही. (atul kanade appointed state excise superintendent)

 

 

UIDAI चं mAadhaar अ‍ॅप वापरून मोबाईल नंबर व्हेरिफाय करा – आता अगदी सोपं !

 

 

 बदली झालेले अधिकारी 

  • सुधाकर कदम – पालघर ➡️ नांदेड
  • शशिकांत गर्जे – नाशिक ➡️ अमरावती
  • संतोष झगडे – छत्रपती संभाजीनगर ➡️ नाशिक
  • गणेश बारगजे – धाराशिव ➡️ पालघर
  • ज्ञानेश्वरी आहेर – अमरावती ➡️ जळगाव
  • अभिजित बालुरे – नाशिक ➡️ छत्रपती संभाजीनगर
  • संजय पाटील – प्रतीक्षा यादीतून ➡️ सिंधुदुर्ग
Local ad 1