सावधान ! दारूमुळे बळावतोय कॅन्सर ; वर्षभरात किती सापडले रुग्ण

दिल्ली : दारु पिणे हे (Alcohol) आरोग्यास हानिकारक, असा इशारा आपण जागोजागी पाहतो. परंतु ते पिणे कोणी सोडत नाही. उलट तरुणाई दारुच्या आहरी जात आहे. दारूमुळे किडनी, म्हणजेच मूत्रपिंडाचे विकार होतात. लिव्हर म्हणजे यकृत खराब होतं हे जवळपास सर्वांनाच माहिती आहे. मात्र, आता एका अभ्यासात धक्कादाय माहिती समोर आली आहे. अति मद्यपानामुळे कॅन्सरसाऱख्या आजार (Alcohol causes cancer) होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता दारु किती प्यायची किंवा नाही हे ठरवण्याची वेळ आली आहे.

 

लँसेट आँकोलॉजी (Lancet Oncology) या नियतकालिकाच्या जुलै 2021 मधील अंकात दारुमुळे कॅन्सर बळवात असल्याचे संशोधन अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली असून, ती म्हणजे 2020 साली अति मद्यपानामुळे सुमारे साडे सात लाख लोकांना कॅन्सरची (Alcohol and cancer relation) लागण झाल्याचे सागंण्यात आले आहे.

 

2020 सालातील एकूण नव्या कॅन्सर रुग्णांपैकी (Cancer patients registered in 2020) चार टक्के रुग्णांना मद्यपानामुळे कॅन्सरची लागण झाल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. यात सर्वाधिक अमेरिकी नागरिकांचा समावेश आहे. दारूमुळे कॅन्सर झालेल्या एकूण रुणांपैकी 75 टक्के पुरुष होते, तर उर्वरित महिला आहेत. यापैकी बहुतांश पुरुषांमध्ये लिव्हर किंवा गळ्यापासून पोटापर्यंत असणाऱ्या अन्ननलिकेला कॅन्सरची लागण झाल्याचे निदान झाले आहे. तर महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं (Breast Cancer due to alcohol) प्रमाण सर्वाधिक आहे. यामध्ये बहुतांशपणे एका दिवशी दोन किंवा त्यापेक्षा अधिक ड्रिंक्सचे (Cancer and Alcohol) पेग सेवन करणाऱ्या लोकांचा समावेश असल्याचा खुलासा करण्यात आला आहे.

 

 

Local ad 1