...

RDC ज्योति कदम : नवरात्रोत्सवातील स्त्रीशक्तीची प्रेरणा

देशभरात शारदीय नवरात्र उत्सवाचा शुभारंभ श्रद्धा व उत्साहाने झाला आहे. नवरात्र हे केवळ देवी आराधनेचे पर्व नाही, तर स्त्रीशक्ती (Navratri)  योगदान आणि समाजातील तिच्या कार्यकौशल्याचे स्मरण करण्याची संधी देखील आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी ज्योति कदम (RDC Jyoti kadam) यांची वाटचाल व कार्यशैली हा अनेक महिलांसाठी प्रेरणादायी आदर्श आहे. (RDC Jyoti kadam Women Empowerment Navratri Pune)

 

 

 

ज्योति कदम या मूळच्या संभाजीनगर (औरंगाबाद) येथील. त्यांनी बी.ई. (मेकॅनिकल) व एमबीए (मार्केटिंग) पदवी घेतल्यानंतर एमपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळे त्या १९९८ मध्ये पहिल्याच प्रयत्नात यशस्वी ठरल्या आणि वर्ग-१ प्रशासनिक सेवेत निवड झाल्या. “आई-बाबा आणि कुटुंबियांचा आधार हाच माझा खरा बळ आहे,” असे त्या सांगतात. गेल्या २५ वर्षांत त्यांनी हवेली प्रांताधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, तसेच माढा-कुर्डुवाडी उपविभागीय अधिकारी अशी अनेक महत्त्वाची पदे भूषवली असून सध्या त्या पुणे जिल्ह्यात निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

 

Pune Traffic Jam। पुण्यातील ३२ रस्त्यांच्या पाहणीतुन धक्कादायक माहिती उघड !

 

 

ऐतिहासिक मतमोजणीचा विक्रम

२०१४ साली महाराष्ट्रासह पाच राज्यांत विधानसभा निवडणुका झाल्या. त्यावेळी पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्याची जबाबदारी कदम यांच्यावर होती. सुमारे ४ लाख मतदार आणि २०० कर्मचारी यांच्या देखरेखीचे काम त्यांनी अचूक नियोजनाने पार पाडले. अंदाजे ४-५ तास लागतील असे गृहीत धरलेले मतमोजणीचे काम त्यांनी अवघ्या १ तास ५० मिनिटांत पूर्ण करून निकाल जाहीर केला. देशाच्या निवडणूक इतिहासातील हा सर्वांत जलद निकाल ठरला. या कामगिरीबद्दल भारत निवडणूक आयोगाने विशेष दखल घेत त्यांना गौरविले. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. “वेल डन, ग्रेट” असे शब्द स्वतः कलाम सरांनी त्यांना संबोधले, ही त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रेरणा ठरली.

 

RDC Jyoti Kadam
RDC Jyoti Kadam

न्याय मिळवून देण्याची तळमळ

गेल्या अडीच वर्षांपासून त्या निवासी उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहेत. या काळात त्यांच्यासमोर वृद्धांच्या न्यायासंबंधी अनेक प्रकरणे आली. अनेकदा मुलांकडून घराबाहेर काढलेले किंवा वृद्धाश्रमात पाठवलेले पालक त्यांच्या दाराशी आले. अशा प्रकरणांत दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून, कायद्याच्या आधारे वृद्धांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न कदम करतात. “पालकांनी आयुष्यभर मुलांसाठी झटून संपत्ती निर्माण केली. वृध्दावस्थेत त्यांच्याशी अन्याय होणे हे समाजासाठी घातक आहे. अशा वेळेस त्यांना न्याय मिळवून देणे हेच माझे भाग्य आहे,” असे त्या सांगतात.

 

 

स्त्रीशक्तीला विशेष संदेश

नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी महिलांना संदेश दिला की, “कोणत्याही संकटाला वा अपयशाला घाबरू नका. आत्मविश्वासाने पुढे चला. स्त्रीशक्ती निर्धाराने उभी राहिली, तर समाजात नक्कीच सकारात्मक बदल घडतो.” ज्योति कदम यांचे कार्यकुशल, शिस्तबद्ध आणि संवेदनशील प्रशासनिक जीवन हे स्त्रीशक्तीचे खरे प्रतिबिंब आहे. ऐतिहासिक निवडणूक विक्रमापासून ते वृद्धांना न्याय मिळवून देण्यापर्यंत त्यांच्या वाटचालीतून प्रेरणा घेण्यासारखे बरेच काही आहे. नवरात्राच्या पावन पर्वावर त्यांचा हा संदेश केवळ महिलांसाठी नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी दीपस्तंभ ठरतो.

Local ad 1