...

Devendra Fadnavis। देवेंद्र फडणवीस यांना दिवसा पडतायेत पंतप्रधानपदाची स्वप्ने ; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप मध्ये पत्रकारांशी साधला संवाद

पुणे : “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता फक्त रात्रीच नव्हे तर दिवसाही पंतप्रधान होण्याची स्वप्ने दिवसाही पडत आहेत,” अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. (Devendra Fadnavis Now Dreaming of Becoming Prime Minister Even in Daytime)

 

पुण्यात पाणी संकट गडद? पाणी कपात चर्चेला PMC आयुक्तांचा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी नकार

 

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात सपकाळ म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. रेशीमबागेतून संकेत आले आहेत की मोदींना राजीनामा द्यावा लागेल आणि त्यांची जागा नवा पंतप्रधान घेईल. ही माहिती फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे त्यांना पंतप्रधानपदाची स्वप्ने पडू लागली आहेत.”

 

Zilla Parishad Elections 2025। जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकांना हिरवा कंदील : नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

 

ते पुढे म्हणाले, “मोदींकडे दोन मोठे राष्ट्रीय ‘शेठ’ आहेत ज्यांच्या मदतीने त्यांनी संसाधन गडगंज केले. तसंच फडणवीस हे मुंबईतील कंबोज नावाच्या व्यक्तीला गडगंज करत आहेत. पंतप्रधान होण्यासाठी लागणारा ‘मसाला’ जमवण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकली आहे. अदाणीला संसाधन देऊन उर्वरित मुंबई कंबोजकडे सोपवण्याची प्रक्रिया सुरू आहे.”

 

पॅनकार्ड क्लब गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवण्यासंदर्भात प्रलंबित कार्यवाही पूर्ण करा – योगेश कदम

 

सपकाळ यांनी यावेळी फडणवीस यांचा हिंदी भाषेतील आग्रहावरूनही टोला लगावला. “मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्रात हिंदीचा पुरस्कार केला. यामागे उद्देश हिंदी पट्ट्यात आपली लोकप्रियता वाढवण्याचा आहे,” असे ते म्हणाले. २०१४ ते २०१९ दरम्यान फडणवीस यांची चांगली प्रतिमा होती, ती आता ते भांडवल म्हणून वापरू पाहत असल्याचे सपकाळ यांनी नमूद केले.

Local ad 1