पुणे, १५ सप्टेंबर : हवामान विभागाने महाराष्ट्रासाठी गंभीर हवामानाचा इशारा जारी केला आहे. १५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७:३० पासून पुढील सहा तास राज्यातील २६ जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. या काळात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तविण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, कोकण किनारपट्टीपासून विदर्भ व मराठवाड्यापर्यंत अतिवृष्टीचा धोका असल्याने प्रशासनानेही नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
मराठवाडा : नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशिव, बीड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर
विदर्भ : यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा
उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्र : जळगाव, धुळे, नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, सातारा
कोकण विभाग : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी
नागरिकांनी घ्यावयाची काळजी
* नद्या-नाल्यांचा पाणीप्रवाह अचानक वाढू शकतो, त्यामुळे खबरदारी घ्यावी.
* अनावश्यक प्रवास टाळावा.
* उघड्यावर झोपणे किंवा असुरक्षित जागी थांबणे टाळावे.
* वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता लक्षात घेऊन पर्यायी व्यवस्था ठेवावी.
* मोबाईलवर येणारे IMD (हवामान विभाग) किंवा स्थानिक प्रशासनाचे अलर्ट लक्षपूर्वक पाळावेत.