भारत-पाक सामना ; माजी क्रीडामंत्री अनुराग ठाकूर म्हणाले सामना का होतोय…
पुणे : आशिया कप २०२५ अंतर्गत भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी, (१४ सप्टेंबर) बहुप्रतिक्षित सामना रंगणार आहे. मात्र, जम्मू – काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या सामन्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. विविध संघटना आणि विरोधी पक्षांकडून सामन्याचा बहिष्कार करण्याची तसेच सामना रद्द करण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे खासदार आणि माजी क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना देशाची भूमिका स्पष्ट केली. ठाकूर म्हणाले की, “या सामन्यात भारताचा सहभाग हा कोणत्याही धोरणात्मक बदलामुळे नाही, तर स्पर्धेच्या नियमांमुळे बंधनकारक आहे.”
MHADA Lottery Pune : गरीब खासदार-आमदारांसाठी म्हाडाच्या सोडतीत ११३ घरे राखीव
ठाकूर पुढे म्हणाले, “जेव्हा एसीसी किंवा आयसीसी बहुराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करते, तेव्हा प्रत्येक देशासाठी सहभागी होणे आवश्यक असते. अन्यथा संघाला स्पर्धेतून बाहेर काढले जाते, सामना गमवावा लागतो आणि गुण प्रतिस्पर्ध्याला दिले जातात. त्यामुळे बहुराष्ट्रीय स्पर्धेत खेळणे अनिवार्य असते.” त्यांनी यावेळी भारत सरकारची ठाम भूमिका देखील स्पष्ट केली. “भारत अनेक वर्षांपूर्वीच ठरवून टाकले आहे की पाकिस्तान दहशतवाद संपवून भारतावर हल्ले थांबवत नाही, तोपर्यंत भारत पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका खेळणार नाही,” असे ठाकूर म्हणाले.
Gen Z ते Gen Beta : पिढ्यांचे वर्गीकरण आणि वैशिष्ट्ये | Generations Explained in Marathi
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर एआयएमआयएम आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्यासह अनेक विरोधी पक्षांनी भारत-पाकिस्तान सामना रद्द करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी भाजपा आणि बीसीसीआयवरही जोरदार टीका केली आहे.