...

सगरोळीच्या सांस्कृतिक संवर्धन मंडळाला ‘मराठवाडा भूषण पुरस्कार’

पुणे : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त यंदाचे मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पुण्यातील मराठवाडा समन्वय समितीच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव होणार आहे. समितीचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील यांनी पत्रकार परिषदेत पुरस्कारांची घोषणा केली.या वेळी समितीचे सचिव दत्ता मेहेत्रे, कोषाध्यक्ष अॅड. विलास रुऊत, कार्यकारिणी सदस्य प्रभाकर चेडे आणि धनराज गरड उपस्थित होते.

 

 

ZP Elections 2025 । जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर

 

 

सामाजिक क्षेत्र : हरिश्चंद्र सुडे (ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठाण, बुधोड, लातूर)
शैक्षणिक क्षेत्र : सांस्कृतिक संवर्धन मंडळ, सगरोळी (नांदेड)
पत्रकारिता क्षेत्र : राहुल कुलकर्णी (एनडीटीव्ही मराठी)
प्रशासकीय क्षेत्र : ओमप्रकाश यादव (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, कोल्हापूर जिल्हा परिषद)
कृषी क्षेत्र : प्रगतीशील शेतकरी दत्तात्रय जाधव (उदंडवडगाव, बीड)
उद्योजकता क्षेत्र : राजेंद्र नारायणपुरे (श्री इंजिनिअरिंग, कात्रज)

 

Gen Z ते Gen Beta : पिढ्यांचे वर्गीकरण आणि वैशिष्ट्ये | Generations Explained in Marathi

 

हा पुरस्कार सोहळा १७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वा. बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे होणार आहे. अध्यक्ष म्हणून राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे उपस्थित राहणार असून, प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि मान्यवर म्हणून महात्मा गांधी मिशन संस्थेचे सचिव अंकुशराव कदम उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात ‘रणगाथा शौर्याची’ हा सांस्कृतिक कार्यक्रम, ‘वैभवशाली मराठवाडा २०२५’ विशेषांक प्रकाशन आणि स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

Local ad 1