...

UIDAI चा नवा नियम : आधारमध्ये जन्मतारीख बदलण्यावर मर्यादा ; कितीवेळा बदल करता येईल जाणून घ्या..

नवी दिल्ली, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने आधार कार्डमध्ये जन्मतारीख बदलण्यासंदर्भात नवे नियम स्पष्ट केले आहेत. आता आधार कार्डमध्ये जन्मतारीख केवळ एकदाच अपडेट करता येणार आहे. एकदा बदल झाल्यानंतर पुन्हा जन्मतारीख बदलायची असल्यास त्यासाठी ‘अपवादात्मक प्रक्रिया’ (Exceptional Handling) आवश्यक असेल.

 

 

UIDAI च्या नियमानुसार आधारमध्ये एकदा जन्मतारीख अपडेट झाल्यानंतर ती पुन्हा बदलता येणार नाही. मात्र, काही वेळा चुकीची नोंद झाली असेल किंवा इतर कारणास्तव जन्मतारीख दुरुस्ती करण्याची खरी गरज भासल्यास नागरिकांना अपवादात्मक प्रक्रिया राबवावी लागेल.

 

 

महिला पत्रकाराचा विनयभंग प्रकरणी दोन आरोपी न्यायालयीन कोठडीत

 

अपवादात्मक प्रक्रियेसाठी लागणारी कागदपत्रे

अपवादात्मक प्रक्रियेत जन्मतारीख बदलण्यासाठी आधार सेवा केंद्रात खालील कागदपत्रांसह उपस्थित राहावे लागेल.
1. जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, 1969 अंतर्गत प्राधिकरणाकडून जारी झालेले जन्मतारीख प्रमाणपत्र.
2. स्व-घोषणा (Self-Declaration)– ज्यात व्यक्ती स्वतः नमूद करेल की जन्मतारीख बदलण्याची विनंती केली जात आहे आणि एकदा सेवा घेतल्यानंतर पुन्हा दुरुस्तीची मागणी आहे.

 

SOP जाणून घ्या…

UIDAI ने नागरिकांना आवाहन केले आहे की अधिक माहिती मिळवण्यासाठी संबंधित मानक कार्यपद्धती (SOP) वाचावी. यात अपवादात्मक प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत.

 

 

नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना

आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी सर्वात महत्त्वाचे ओळखपत्र आहे. त्यात नोंदलेली जन्मतारीख बँकिंग, शिक्षण, नोकरी, सरकारी योजना अशा अनेक क्षेत्रांमध्ये उपयोगी ठरते. त्यामुळे आधारमध्ये जन्मतारीख नोंदवताना अचूक माहितीच द्यावी, असे UIDAI ने नागरिकांना सूचित केले आहे.

Local ad 1