पुणे श्रमिक पत्रकार संघ निवडणूक : ब्रिजमोहन पाटील अध्यक्ष, समीर सय्यद कार्यकारिणी सदस्यपदी विजयी
‘दिव्यमराठी’चे मंगेश फल्ले सरचिटणीस
पुणे. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या 2025-2026 या कार्यकालासाठी झालेल्या निवडणुकीत ‘सकाळ’चे ब्रिजमोहन पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. ‘दिव्यमराठी’चे मंगेश फल्ले सरचिटणीसपदी तर ‘केसरी’चे दिलीप तायडे खजिनदारपदी विजयी झाले. ‘नवभारत’चे समीर सय्यद हे कार्यकारिणी सदस्य म्हणून विजयी झाले आले आहेत. (pune journalist union election 2025-26)
निवडणुकीत विजयी झालेली प्रमुख पदाधिकारी
अध्यक्ष : ब्रिजमोहन पाटील (सकाळ)
उपाध्यक्ष : राजा गायकवाड (महाराष्ट्र टाइम्स), सागर आव्हाड (साम टीव्ही)
सरचिटणीस : मंगेश फल्ले (दिव्यमराठी)
चिटणीस (बिनविरोध) : चौधरी निलेश (पुण्यनगरी), तनिष्का डोंगरे (सकाळ)
खजिनदार : दिलीप तायडे (केसरी)
भाजपचे माजी मंत्री बाबनराव लोणीकर यांच्या अपमानास्पद वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध
कार्यकारिणी सदस्यपदी विजयी झालेले
लक्ष्मण खोत (दैनिक भास्कर)
राजाराम पवार (सामना)
दत्तात्रय आढाळगे (सामना)
अतुल चिंचली (लोकमत)
नरेंद्र साठे (सकाळ)
आशिष देशमुख (पुढारी)
समीर सय्यद (नवभारत)
विक्रांत कुलकर्णी (केसरी)
तेजस टवलारकर (महाराष्ट्र टाइम्स)
सय्यद सज्जाद (ई टीव्ही भारत)
या निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. प्रताप परदेशी आणि सहाय्यक अधिकारी अॅड. स्वप्नील जोशी यांनी संयोजन केले.