...

शिक्षणाचा बाजार ! पुण्यात मान्यता नसलेल्या 13 शाळांचा पर्दाफाश

२४ शाळा मूळ जागेवर नाहीत, पालकांना दक्षतेचे आवाहन

पुणे : पुणे जिल्हा परिषदेकडून दर वर्षी अनाधिकृत शाळांची यादी जाहिर केली जाते. यंदा म्हणजेच शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी १३ शाळा शासनाची आवश्यक मान्यता नसताना प्रवेश जाहिरात करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात १३ शाळा पूर्णतः अनधिकृत असून, २४ शाळा शासनमान्यता असूनही मूळ जागेवर चालू नाहीत. तसेच, ९ शाळांकडे केवळ इरादा पत्र असून अंतिम मान्यता मिळालेली नाही, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने दिली आहे.

 

 

खासगी इंग्रजी माध्यम शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांचा कल असतो. मात्र, शाळेची मान्यता आहे की नाही याबाबत माहिती नसल्याने अनेक पालक फसवले जातात. शिक्षण विभाग कारवाई करताच विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता असते. (pune unauthorized schools list 2025)

 

इंद्रायणी पूल दुर्घटनेत चौघांचा मृत्यू, ५१ जखमी

 

दुसऱ्यांदा जाहीर झालेली अनधिकृत शाळांची यादी

जानेवारी महिन्यात जिल्हा परिषदेने १३ अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली होती. आता शाळा सुरू होण्याच्या आदल्या दिवशी पुन्हा एकदा याच तेराच शाळांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये जानेवारीतील यादीतील दोन शाळांची नावे पुन्हा आली आहेत. (pune unauthorized schools list 2025)

 

 

pune unauthorized schools list 2025

 

शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी सांगितले, “पालकांनी अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये, अन्यथा विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येऊ शकते. पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पंचायत समिती आणि गटशिक्षणाधिकारी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत शाळा तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत.” (pune unauthorized schools list 2025)

 

 

‘पुणे मॉडेल’ उपक्रमाची सुरुवात : शिक्षण आणि आरोग्य विकासाची नवी दिशा !

 

अनधिकृत शाळांची नावे

  • एस.पी. इंग्लिश मिडियम स्कूल, वाघोली.
  • कलर स्कूल, ताथवडे.
  • न्यू विस्डम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे.
  • किंग्जवे पब्लिक स्कूल, लोणावळा.
  • माय स्कूल, ताथवडे. ॉ
  • न्यू मिलेनियम स्टार इंग्लिश मीडिअम स्कूल, बिबवेवाडी.
  • आयडियल पब्लिक स्कूल, धायरी.
  • महात्मा गांधी प्रशाला.
  • टीम्स तकवा इस्लामिक स्कूल ॲण्ड मक्तब, कोंढवा.
  • सेंट व्ह्यू इंटरनॅशनल स्कूल, कोंढवा.
  • इमॅन्युअल पब्लिक स्कूल, हडपसर.
  • मॅरेथॉन इंटरनॅशनल स्कूल, सोलापूर रोड.
  • आर्यन वर्ल्ड स्कूल, नऱ्हे

 

Local ad 1