पुणे. पुण्यातील प्रसिद्ध गिडवानी आणि ललानी कुटुंब यांच्यातील दिवाणी वाद टोकाला गेला असून, येरवडा पोलिस स्टेशन येथे सोनिया गिडवानी नरहरे (उद्योजिका व समाजसेविका) यांच्याविरुद्ध मानवी गुन्हा दाखल करण्यात आला. सोनिया गिडवानी नरहरे ह्या पुण्यातील कल्याणी नगर येथे हॉटेल स्प्रिंग ब्रूक चालवतात. सोनिया गिडवानी नरहरे चालवत असलेल्या हॉटेलमधे मानवी तस्करी होत होती आणि त्या हॉटेलवर छापा टाकण्यात आला, असा सांगून गुन्हा नोंदविण्यात आला होता. सोनिया गिडवानी नरहरे यांनी ॲड. विपुल व्ही. दुषिंग यांच्यामार्फत अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. त्यात या हॉटेलसंदर्भात दिवाणी दावा प्रलंबित आहे आणि सोनिया गिडवानी नरहरे यांच्यावर दबाव टाकून त्यांच्याकडून हॉटेलचा ताबा मिळवण्यासाठी मालमत्तेच्या मालकांनी या हॉटेलवर खोटा छापा टाकण्याची योजना आखली, असा युक्तिवाद केला. (Court grants relief to Hotel Spring Brook operator)
पुण्यात काय पण होई शकते ! ठेकेदाराने पुणे महापालिकेला मागितली 79 कोटींची नुकसान भरपाई
Related Posts
सत्र न्यायालयाने संबंधित पक्षांची सविस्तर सुनावणी केल्यानंतर 15.04.2023 च्या आदेशान्वये सोनिया गिडवानी नरहरे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. ज्यामध्ये सोनिया गिडवानी नरहरे यांच्या ताब्यातील हॉटेल तपास यंत्रणेने त्यांची बाजू न ऐकता घाईघाईने सील केल्याचा दावा करत सोनिया गिडवानी यांनी पुन्हा त्यांचे वकील ॲड. विपुल व्ही. दुषिंग यांच्यामार्फत सत्र न्यायालयात फौजदारी पुनर्निरीक्षण याचिका दाखल करून तपास यंत्रणेच्या या दुर्भावनापूर्ण कारवाईला आव्हान दिले, अशी माहिती वकीलांनी दिली.
या याचिकेवर न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर 29.04.2025 च्या आदेशान्वये ती मंजूर करण्यात आली. सत्र न्यायालयाने तपास यंत्रणेच्या या बेकायदेशीर कारवाईचा तीव्र निषेध केला आणि केवळ सोनिया गिडवानी नरहरे यांनाच हॉटेलचा ताबा परत देण्याचे निरीक्षण नोंदवले. सदर पुनर्निरीक्षण याचिकेच्या सुनावणीदरम्यान, परवेझ ललानी यांनी मालमत्तेचा ताबा मिळवण्यासाठी हस्तक्षेप अर्ज दाखल केला, परंतु सत्र न्यायालयाने त्यांची ही मागणी फेटाळली. सोनिया गिडवानी नरहरे यांचेतर्फे ॲड. विपुल व्ही. दुषिंग, ॲड. स्वानंद जी. गोविंदवार, ॲड. रोहित एस. राहिंज, ॲड. अभिनव व्ही. नलावडे यांनी काम बघितले.