डॉ. अनिल रामोड यांना 13 जूनपर्यंत कोठडी, किती मिळाली रोख रक्कम ?

पुणे : पुणे विभागाचे अपर आयुक्त डॉक्टर अनिल रामोड (Pune Division Additional Commissioner Dr. Anil Ramod) यांना आठ लाख रुपयांची लाच घेताना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) शुक्रवारी अटक केली होती. त्यांना आज दुपारी न्यायालयात हजर केले असता 13 जून पर्यंत पोलीस कोठडी (Police custody) न्यायालयाने सुनावली आहे. 

 

MH Times Exclusive News । आयएएस अधिकाऱ्यावरील सीबीआयच्या कारवाईने महसूल विभाग हदरले !

अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त अनिल रामोड यांना 8 लाख रुपयांची लाच घेताना ‘सीबीआय’ने अटक केली. त्यानंतर सीबीआयने छाप्यात 6 कोटी 64 लाख रुपये जप्त केले आहेत. डॉ अनिल रामोड यांना आज पुण्यातील शिवाजीनगर येथील न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना 13 जून पर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

 

डॉ अनिल रामोड यांना आज न्यायालयात हजर केल्यावार झालेल्या सुनावणीमध्ये धक्कादायक माहिती ही समोर आली. काल जेव्हा सीबीआयकडून डॉ.अनिल रामोड यांच्या कार्यालयात छापा टाकण्यात आला. तेव्हा त्यांच्या कार्यालयातून आयफोन मोबाईल हे सापडले आहे. यात 2 जुने आणि एक नवीन आयफोन होता. काल केलेल्या तपासात एकूण 6 कोटी 64 लाख जप्त केले आहे. अधिक तपास तसेच डॉ.अनिल रामोड यांचं व्हाइस टेस्ट करायची आहे. अस यावेळी सीबीआय अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितलं. त्यामुळे पाच दिवसांची कोठडी मागितली होती. परंतु  न्यायालयाने त्यांना 13 जून पर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.

 

 

डॉ. रामोड यांनी आठ लाख रुपयांची लाच मागितली असल्याची तक्रार एक महिन्यापूर्वी सीबीआयकडे (CBI) आली होती. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर काल दुपारच्या सुमारास रामोड यांच्या कार्यालयातच सीबीआयने सापळा रचला होता. त्यानंतर आठ लाख रुपयांची तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना रामोड यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर रामोड यांच्या बाणेर परिसरातील फ्लॅटवर देखील सीबीआयने छापेमारी केली आणि तब्बल या छाप्यात 6 कोटी 64 लाख रुपये जप्त केले आहे.

Local ad 1