ZP Elections 2025 । मुंबई : राज्यात जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजण्याच्या तयारीत असतानाच आज मोठा टप्पा गाठला गेला आहे. ३४ जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले असून त्यामुळे राजकीय समीकरणे ढवळून निघाली आहेत. कोणत्या जिल्ह्यात कोणते पद खुलं, तर कुठे महिलांसाठी राखीव? यावरून आता सर्व पक्षांत रणनीती आखणी सुरू झाली आहे.
कोंढव्यातील मुलींच्या शिक्षणाला चालना : ९ वी व १० वीच्या वर्गांना अखेर मंजुरी
ठाणे, कोल्हापूर, सांगली, लातूर, अमरावती, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांत अध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. तर पुणे, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा आणि यवतमाळ येथे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले राहणार आहे.
या आरक्षणामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये स्थानिक नेत्यांची गणितं कोलमडणार आहेत, तर काही ठिकाणी नव्या नेतृत्वाला संधी मिळणार आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट व अजित पवार गट) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे गट) या सर्व पक्षांत रणनीतीचे फेरबदल सुरू झाले आहेत.
राज्याच्या राजकारणातील या निवडणुका आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली असून काही दिवसांतच निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
कोणत्या जिल्ह्यात कोणते आरक्षण?
ठाणे – सर्वसाधारण (महिला)
पालघर – अनुसूचित जमाती
रायगड – सर्वसाधारण
रत्नागिरी – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सिंधुदुर्ग – सर्वसाधारण
नाशिक – सर्वसाधारण
धुळे – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
नंदुरबार – अनुसूचित जमाती
जळगाव – सर्वसाधारण
अहमदनगर – अनुसूचित जमाती (महिला)
पुणे– सर्वसाधारण
सातारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला
सांगली – सर्वसाधारण (महिला)
सोलापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
कोल्हापूर – सर्वसाधारण (महिला)
छत्रपती संभाजीनगर – सर्वसाधारण
जालना – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
बीड – अनुसूचित जाती (महिला)
हिंगोली – अनुसूचित जाती
नांदेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग
धाराशिव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
लातूर – सर्वसाधारण (महिला)
अमरावती – सर्वसाधारण (महिला)
अकोला – अनुसूचित जमाती (महिला)
परभणी – अनुसूचित जाती
वाशिम – अनुसूचित जमाती (महिला)
बुलढाणा – सर्वसाधारण
यवतमाळ – सर्वसाधारण
नागपूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
वर्धा – अनुसूचित जाती
भंडारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग
गोंदिया – सर्वसाधारण (महिला)
चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला)
गडचिरोली – सर्वसाधारण (महिला)