जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आरक्षण सोडत स्थगित

मुंबई : जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षण सोडतीला राज्य निवडणूक आयोगाकडून स्थगिती देण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी जारी केला आहे. (Big political news: Zilla Parishad and Panchayat Samiti postpone reservation)

 

 

 

का? स्थगिती देण्यात आली

राज्य निवडणूक आयोगाचे दि.०५/०७/२०२२ रोजीच्या पत्रान्वये २५ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत २८४ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूका – २०२२ करिता आरक्षण सोडतीचा कार्यक्रम देण्यात आला आहे. परंतु मा. सर्वोच्च न्यायालयातील दाखल विशेष अनुमती याचिका क्र. १९७५६/२०२१ मध्ये राज्य शासनाने दाखल केलेल्या अर्जावर आज दि. १२/०७/२०२२ रोजी सुनावणी झाली असून एका आठवडयानंतर पुढील सुनावणी होणार आहे. Big (political news: Zilla Parishad and Panchayat Samiti postpone reservation)

 

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ मिळणार

 

 

नवीन तारीख दिली जाणार

आयोगाचे दि.०५/०७/२०२२ रोजीच्या आदेशान्वये देण्यात आलेला जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडत कार्यक्रम तूर्त स्थगित करण्यात येत आहे. यासंदर्भात सुधारीत आरक्षण सोडत कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.(Big political news: Zilla Parishad and Panchayat Samiti postpone reservation)

Local ad 1