मुस्लिम बांधवांचा तबलिगी इज्तेमा काय आसतो?

इज्तेमा म्हणजे जाहिर अधिवेशन. “तबलिगी इज्तेमा” (Tablighi Ijtema) हा काय प्रकार असतो, (What is Tablighi Ijtema of Muslim brothers?) याचे कुतुहल इतर धर्मातील समाज बांधवांना असते. पण माहित असणे आवश्यक आहे. म्हणून आपण आधी तबलिगी जमातचाा परिचय करून घेऊ… नुकतेच परभणी आणि हिंगोली  जिल्ह्यांचा संयुक्त तबलिगी इज्तेमापेडगाव येथे पारपडला. त्यावर पेडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते शेख निसार पेडगावकर यांनी मांडलेले अनुभव आणि तबलिगी इज्तेमा का आयोजित केले जाते.. हे त्यांच्याच शब्दांत..

 

 

पाठीवर भलेमोठे बॅग, पिशव्या, गाठोडे वगैरे घेतलेले कुर्ता, पायजामा घातलेले लांब-लांब दाढी, टोपीवाल्यांचा जत्था रस्त्याने जात असतांना तुम्ही अनेक वेळा पाहिला असेल. हे जत्थे म्हणजे काही मोजक्या यशस्वी मुस्लिम चळवळीपैकी एक ती चळवळ आहे. (तबलिगी जमात)  सन 1927 मध्ये हरयाणातील मेवात शहरात मौलाना इलियास कांधलवी (Maulana Ilyas Kandhalvi) यांनी  तबलिगी जमातची स्थापना केली. विशेष म्हणजे ही संघटना किंवा सांप्रदाय नसून, फक्त एक चळवळ आहे. याचे मुख्य केंद्र दिल्ली येथील निजामुद्दीन परिसरात आहे. (The main center is in Nizamuddin area of ​​Delhi.) मौलाना साद (Maulana Saad) हे सध्या याचे प्रमुख आहेत.

 भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ (India, Pakistan, Bangladesh, Nepal) व इतर दक्षिण आशियाई देश (South Asian countries) यांचे प्रमुख कार्यक्षेत्र आहेत. भारतीय उपमहाद्विपात इतरांच्या अंधानुकरणातून काही कर्मकांडे मुस्लिम समाजात घुसल्याने अनेक रूढी परंपरांच्या आहारी इथला समाज गेला होता. त्यात सुधारणा करून खरा इस्लाम लोकांना समाजाऊन सांगणे, नमाज पढण्याची पद्धत शिकवणे, तसेच दारूबंदी, व्यसनमूक्ती, व्यभिचारमूक्ती व इतर वाईट सवयींच्या निर्मुलनाकरिताही यात प्रशिक्षण दिले जाते. (What is Tablighi Ijtema of Muslim brothers?)

तबलिगी जमातचे कुठेही स्थानिक कार्यालय नसते. गावा-गावात जत्थे (जमात) बनवून मशिदीत काही दिवस मुक्काम करतात, तिथल्या स्थानिक लोकांचं प्रबोधन करतात आणि तिथल्या काही स्थानिक लोकांना सामील करून तो जत्था पुढे जातो. तीन दिवस, दहा दिवस, 40 दिवस किंवा 4 महिने असे वेगवेगळे कालावधीचे प्रत्येक जण आपापल्या सोयीनुसार या जत्थात योगदान देत असतो. ज्याचा कालावधी पूर्ण झाला तो घरी निघून जात असतो आणि नवीन जुळलेल्या “साथी”चा कालावधी सुरू होत असतो. अशाप्रकारे हे जत्थे एकाचवेळी जगभरात भ्रमण करत असतात.

लोकं बदलत असतात पण जत्था (जमात) तीच राहते. काही जमात एकमेकांत समाविष्ट केले जातात तर काही जमाती मोठ्या झाल्या की त्याचे दोन-तीन गटांत विभागणी करून वेगवेगळ्या दिशेने पाठविले जातात. याचे नियोजन करण्यासाठी कुठेतरी वर्षातून, महिन्यातून “जोड” (बैठक) हा कार्यक्रम ठेवला जातो. जत्थाचा एक स्थानिक “अमीर (प्रमुख)” निवडला जातो. जागोजागी रोज मशिदीत दिवसातून एकदा “मशवरा (सल्लामसल्लत)” होत असते. मुस्लिम वस्तीत प्रत्येक नमाज नंतर गस्त घातली जाते. घरोघरी जाऊन प्रबोधन केले जाते, नमाजसाठी आमंत्रित केलं जाते. तसेच जमातसोबत दुसऱ्या गावी निघण्याकरिता आग्रह केला जातो. अशाप्रकारे ही जमात म्हणजे धार्मिक प्रौढ शिक्षणासाठी एक चालती बोलती शाळा (मदरसा) आहे.

या जमाअतचे लोकं दर्गाहवर जाणे, तिथं नवस वगैरे फेडणे अश्या गोष्टींना मानत नाही. ही एक गैरराजकीय चळवळ आहे. इतर लौकिक बाबतीत राजकीय कोणतीही चर्चा किंवा वक्तव्य करत नाही. फक्त धार्मिक आणि त्यातल्या त्यात नमाज पढण्यावरच ही जमात जास्त भर देते. यांच्या इज्तेमा (जाहिर अधिवेशन) मध्ये वक्त्याचे नाव दिलेले नसते तर फक्त “बयाण (भाषण)” आणि त्याची वेळ दिलेली असते. लग्नकार्यात उधळपट्टी नको, आई वडिलांची सेवा, पती-पत्नीचे अधिकार, लेकरांचे संगोपन, हलाल कमाईचे महत्व, प्रबोधनाची गरज, त्यासाठी त्यागाचे महत्व, नमाजचे महत्व यासारखे त्यांच्या भाषणाचे विषय असतात.

जमातमध्ये अमीरचा आदेश, वेळेचं नियोजन वगैरे यांची शिस्त वाखाणण्याजोगी आहे. इज्तेमाच्या शेवटी  स्वतःसाठी, समाजासाठी, देशासाठी आणि संपूर्ण जगासाठी एक एक – दोन दोन तास दुवा मागितली जाते. सर्वसाधारणपणे देवबंद, नदवा, अक्कलकुवा वगैरे मदरश्यातील उलेमा (विचारवंत), मौलवी हे यांचे मार्गदर्शक असतात. जमातमध्ये सोबत प्रवासात असतांना हे एकमेकांशी ज्याप्रमाणे सौजन्याने वागतात, ते कौतुकास्पद आहे. (What is Tablighi Ijtema of Muslim brothers?)

जमातबांधनीसाठी सोशल मीडियाचा वापर, व्हिडिओ, फोटोजचा वापर वगैरे आधुनिक बदलही स्विकारले जात आहेत, ही सकारात्मक परिवर्तनाची नांदी आहे. पेडगांव येथे नुकतंच संपन्न झालेल्या इज्तेमामधे उपस्थित लाखोंच्या जनसमुदायाने ‘प्रतिसाद दिला दरम्यान पेडगांव मधील इज्तेमासाठी ऐतिहासिक गर्दी झाली होती. लाखोंचा जनसमुदाय एकत्र येवुनही कुठेच कोणाला धक्का लागला नाही, कोणाची कोणाविषयी तक्रार नाही, की कोणी कोणावर रागावले ही नाही . अगदी शांत, संयमाने आणि तितक्याच उत्स्फूर्तपणे प्रत्येकजण एकमेकांना साथ देत पुढे चालत होता. या माध्यमातुन प्रचंड शिस्त आणि एकीचे दर्शन घडले. अल्लाहची रहेमत ( कृपा ) आणि हजारोंनी केलेली खिदमत (सेवा) यामुळे पेडगांवचा इज्तेमा यशस्वी ठरला.

मंडपसाठी खड्डे खोदणाऱ्यापासून ते नळ फिटींग, वजुखाने, स्वच्छतागृह, लाईट फिटींग, पाईप लाईन, शेततळे, बिछायत ( चटई टाकणे ), साफसफाई, निगरानी (देखरेख), साऊंड सिस्टीम, दवाखाने आणि त्याठिकाणी कार्यरत डॉक्टर्स – कर्म चारी, मोफत चहापाणी वाटप, ट्रॅक्टर – टँकरने पाणी पुरवठा करणारे, शेतजमिन उपलब्ध करणारे, वाहने लावण्यापासुन ते पार्किंगची व्यवस्था करणारे  रस्त्या रस्त्यावर इज्तेमाची दिशा दाखवणारे, वाहनांच्या टायरचे पंक्चर मोफत काढुन देणारे, बस स्टँडसह इतर भागातुन इज्तेमासाठी जाणाऱ्यांना स्वत:च्या वाहनातून मोफत नेवुन सोडणारे, इज्तेमाच्या तयारीपासुन ते शेवटर्पंत भोजनाची व्यवस्था पहाणाऱ्यांसह ज्ञात व अज्ञात पध्दतीने इज्तेमाच्या ठिकाणी खिदमत (वा) करणाऱ्या हजारोंना  त्यांच्या कार्यकुशलतेची पावती मिळते. या इज्तेमाच्या निमित्ताने मुस्लिम समाजाची एक सकारात्मक प्रतिमा उजळून येत आहे, जो सर्वांसाठी आदर्श ठरणारी आहे.

Local ad 1