IPL season । आयपीएलचा थरार आजपासून रंगणार

मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या मोसमाची सुरुवात आजपासून वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) होत आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (chennai Super Kings vs Kolkata Knight Riders) यांच्यात होणार आहे. आजपासून सुरु होणारा आयपीएलचा हंगाम (IPL season) क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. (The thrill of IPL will start from today)

 

 

 

वानखेडे स्टेडियमवर आज संध्याकाळी ७.३० वाजता सामना सुरू होणार आहे. (The match will start at 7.30 pm at Wankhede Stadium) दोन्ही संघांनी गेल्या हंगामात अप्रतिम प्रदर्शन केले होते. कोलकाता नाईट रायडर्सने तर अंतिम फेरीत झेप घेतली होती. मात्र, चेन्नईने त्यांना पराभूत करून चौथ्यांदा आयपीएलचे अजिंक्यपद पटकावले होते. आता हे गतविजेते आणि उपविजेते पहिल्याच सामन्यात आमने-सामने येत आहेत. त्यात बाजी कोण मारणार याकडे लक्ष लागले आहे. (The thrill of IPL will start from today)

 

कोलकाता आणि चेन्नई या दोन्ही संघांची धुरा नवीन खेळाडुंकडे आहे. केकेआरचे नेतृत्व श्रेयस अय्यर तर सीएसकेचे नेतृत्व रवींद्र जडेजा करत आहे. आतापर्यंतच्या दोन संघातील आकड्यांवर नजर टाकली, तर चेन्नईची बाजू सरस आहे. दोन्ही संघांमध्ये एकूण २६ सामने झाले असून, यात १७ सामने चेन्नईने तर फक्त आठ सामने केकेआरने जिंकले आहेत. (The thrill of IPL will start from today)

 

 

आयपीएल २०२१ मध्ये चेन्नईने कोलकाता नाईट रायडर्सला (Chennai to Kolkata Knight Riders) दोन्ही लीग सामन्यांमध्ये 9 पराभूत केले होते. अंतिम लढतीतही चेन्नईने कोलकाताला २७ धावांनी पराभूत केले होते. मात्र, सलामीच्या सामन्यांमध्ये चेन्नई संघाची कामगिरी खूपच खराब आहे. (The thrill of IPL will start from today)

 

 

 

 

रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) हा सध्या पूर्णपणे तंदुरुस्त असून त्याचाी कामगिरीदेखील उत्तम आहे. त्याचवेळी केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर (KKR captain Shreyas Iyer) याच्याकडूनही लक्षवेधी कामगिरीची अपेक्षा आहे. दोन्ही संघांमध्ये तगडे खेळाडू असल्यामुळे हा पहिलाच सामना चुरशीचा होईल, अशी अपेक्षा चहात्यांची आहे. वानखेडेची खेळपट्टीही ठणठणीत असल्यामुळे या सामन्यात चौकार आणि षटकारांची बरसात पाहायला मिळेल. (The thrill of IPL will start from today)

Local ad 1