रिअल इस्टेल उद्योगाला येणार अच्छे दिन (The real estate industry)

The real estate industry | मुंबई : सुरुवातीला नोंट बंदी (Note Bandi) आणि त्यानंतर कोरोमुळे (Coronavirus) ठप्प झालेला बांधकाम व्यवसायाला (रिअल इस्टेल) फटका बसला आहे. लाखो घर तयार आहेत. मात्र, खरेदीसाठी ग्राहक नसल्याने व्यवसायिक चिंतेत आहेत. मात्र, अता त्यांच्यासाठी आशोचा किरण दिसून येत आहे. येणाऱ्या काही काळात रिअल इस्टेल उद्योग पुन्हा पुर्ववत होईल, असा अंदाज काही संस्थांनी व्यक्त केला आहे. (The real estate industry maharashtra)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर भारतीय अर्थव्यवस्था हळूहळू रुळावर येत आहे. अनेक क्षेत्रांमध्ये नवा उत्साह संचारताना दिसत आहे. यामध्ये कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या बांधकाम उद्योगातही धुगधुगी निर्माण झाली असून येत्या काही दिवसांमध्ये हा व्यवसाय पूर्ण गती पकडेल, असा अंदाज नाईट फ्रँक, फिक्की आणि नारडेको (Knight Frank, Ficci and Nardeco) यासारख्या संस्थांनी वर्तविला आहे. (The real estate industry)

 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बांधकाम साहित्याचा पुरवठा ठप्प झाल्याने आणि अनेक मजूर गावी निघून गेल्याने या क्षेत्राला मोठा फटका बसला. नाईट फ्रँक-नारडेकोच्या रिअल इस्टेट सेंटिमेंट इंडेक्स या सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आली. या सर्वेक्षणानुसार, जानेवारी-मार्च तिमाहीच्या तुलनेत एप्रिल-जून तिमाहीत सेंटिमेंट स्कोर (Sentiment scores for the April-June quarter) 57 टक्क्यांवरून 35 टक्क्यांवर आला. गेल्यावर्षी एप्रिल-जून तिमाहीत तर हा सेंटिमेंट स्कोर 22 टक्के इतका होता. त्या तुलनेत आताची परिस्थिती बरीच चांगली आहे. मात्र, आगामी काळात हे चित्र वेगाने बदलेल. लोक पुन्हा घर खरेदीला सुरुवात करतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (The real estate industry)

 

 

30 मे 2021 रोजी सीआरई मॅट्रिक्स प्रॉपर्टी ट्रॅकर आणि नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून (CRE Matrix Property Tracker and Registration and Stamp Duty Department) मिळालेल्या माहितीनुसार मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) मे 2021 मध्ये 10 हजार 979 कोटी रुपायांची मालमत्ता विक्री व्यवहारांची नोंद झाली आहे. तर एप्रिल 2021 मध्ये 22 हजार 507 कोटी रुपये इतकी झाली. मार्च 2021, फेब्रुवारी 2021 आणि जानेवारी 2021 मध्ये एमएमआर मध्ये नोंदणीकृत मालमत्ता विक्रीचे व्यवहार अनुक्रमे 44167 कोटी रुपये,.21696 कोटी आणि 21484 कोटी रुपये इतके झाले.

30 मे 2021 पर्यंत मुंबईत मालमत्ता विक्री व्यवहारांची नोंद मे 2021 मध्ये रु. 7246 कोटी तर एप्रिल 2021 मध्ये रु. 16250 कोटी इतकी झाली. मार्च 2021, फेब्रुवारी 2021 आणि जानेवारी 2021 मध्ये मुंबईत मालमत्ता विक्रीचे व्यवहार अनुक्रमे रु. 28961 कोटी, रु. 12989 कोटी आणि रु. 12890 कोटी इतके झाले. (The real estate industry)

Local ad 1