यंदा अबादानी : देशात मान्सून 99 टक्के बरसणार

मुंबई : देशात नैऋत्य मोसमी पाऊस सरासरी 99 टक्के बसणार असून तो सामान्य राहील (96 ते 104%)अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली. (The monsoon will rain 99 percent in the country)

 

 

यंदा मान्सून कसा राहील याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे कारण उन्हाळा अति तीव्रतेने जाणवत आहे. देशात सर्वदूर 99 टक्के पाऊस पडेल मात्र पूर्वोत्तर राज्यात तो सरासरीपेक्षा कमी पडेल तर राजस्थान बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश,गुजरात महाराष्ट्र या भागात तो सरासरीपेक्षा जास्त पडण्याची शक्यता आहे. मान्सून नेमका कधी येईल या बाबत महापत्रा यांनी सांगितले की, मान्सून केरळात नेमका कधी येईल ते आत्ताच सांगता येणार नाही.  आम्ही 15 मे रोजी ती तरीख जाहीर करणार आहोत. (The monsoon will rain 99 percent in the country)

 

2022 च्या नैऋत्य मोसमी पावसाच्या अंदाजाचा सारांश

नैऋत्य मोसमी पावसाळी हंगामात (जून ते सप्टेंबर) संपूर्ण देशात पर्जन्यमान सामान्य असण्याची शक्यता आहे (दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या LPA 96 ते 104% ) ब) प्रमाणात्मकदृष्ट्या मान्सून हंगामी (जून ते सप्टेंबर) पर्जन्यमान दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या (LPA) 99% असण्याची शक्यता आहे आणि मॉडेल त्रुटी +5% आहे. 1971-2020 या कालावधीसाठी संपूर्ण देशात हंगामातील पावसाचा दीर्घ कालावधीची सरासरी (एलपीए) 87 सेमी आहे. (The monsoon will rain 99 percent in the country)

 

IMD चे समुद्राच्या स्थितीवर लक्ष

सध्या, विषुववृत्तीय प्रशांत महासागरावर ला निनाची परिस्थती आहे. MMCFS मॉडेलचा अदयावत तसेच इतर हवामान Climate मॉडेलचा अंदाज सूचित करतो की ला-निना परिस्थती येणाऱ्या पावसाळ्यात कायम राहण्याची शक्यता आहे. सध्या हिंद महासागरावर तटस्थ Neutral इंडियन ओशन डायपोल (आय.ओ.डी. IOD) पारिस्थती आहे आणि MMCFS मॉडेलचा अदयावत अंदाज सूचित करतो की नैऋत्य मान्सून हंगामाच्या सुरुवातीपर्यंत तटस्थ आय. ओ. डी स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर, ॠण negative आय.ओ.डी. स्थितीची वाढीव संभाव्यता वर्तवली जाते. प्रशांत आणि हिंद महासागरावरील समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानाचा (SST) भारतीय मान्सूनवर जोरदार प्रभाव असल्याचे ओळखले जाते, म्हणून IMD या महासागरावरील समुद्राच्या पृष्ठभागाच्या स्थितीवर लक्ष ठेवून आहे. (The monsoon will rain 99 percent in the country)

 

 

जून महिन्याचा अंदाज देखील जारी केला जाईल

IMD मे २०२२ महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नैऋत्य मोसमी पावसाळी हंगामातील पावसाचे अद्यतनित (updated) दीर्घकालीन पूर्वानुमान जारी करेल, ज्यामध्ये एप्रिलच्या अंदाज अद्यतनाव्यतिरिक्त, चार भौगोलिक प्रदेशांसाठी मान्सून (जून-सप्टेंबर) पर्जन्यमानाचा अंदाज, मान्सून कोअर झोन आणि जून महिन्याचा अंदाज देखील जारी केला जाईल. (The monsoon will rain 99 percent in the country)

पार्श्वभूमी

 

2003 पासून, भारतीय हवामानशास्त्र विभाग (India Meteorological Department – IMD) नैऋत्य मान्सून हंगामासाठी (जून-सप्टेंबर) संपूर्ण देशभरातील सरासरी पर्जन्यमानाचे (Operational) दीर्घकालीन पूर्वानुमान (LRF) दोन टप्प्यांत जारी करत आहे.

 

पहिल्या टप्प्याचा अंदाज एप्रिलमध्ये जारी केला जातो आणि दुसरा टप्पा किंवा अपडेट अंदाज मे अखेरीस जारी केला जातो. मागील वर्षी, IMD ने सध्याच्या दोन टप्प्यातील अंदाज धोरणात बदल करून देशभरातील नैऋत्य मोसमी पावसासाठी मासिक आणि हंगामी अंदाज जारी करण्यासाठी नवीन धोरण लागू केले आहे. नवीन पद्धतीमध्ये विद्यमान सांख्यिकीय अंदाज प्रणालीसह (SEFS), IMD च्या मान्सून मिशन क्लायमेट फोरकास्ट सिस्टम (MMCFS) सह विविध जागतिक हवामान अंदाज आणि संशोधन केंद्रांवर आधारित नवीन विकसित मल्टी-मॉडेल एन्सेम्बल (MME) अंदाज प्रणाली हे अंदाज देण्यासाठी वापरण्यात आली आहे.

 

 

 

संपूर्ण देशात 2022 नैऋत्य मोसमी पावसाचा (जून-सप्टेंबर) पावसाचा अंदाज. ऑपरेशनल स्टॉटिस्टकल एन्सेम्बल फोरकास्टंग सिस्टम (SEFS) वर आधारित अंदाज. SEFS वर आधारित अंदाज असे सूचित करतो की प्रमाणात्मकदृष्ट्या मान्सूनचा हंगामी पाऊस ± 5% च्या मॉडेल त्रुटीसह दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या (LPA) 99% असण्याची शक्यता आहे. 1971-2020 या कालावधीसाठी संपूर्ण देशात हंगामातील पावसाचा दीर्घ कालावधीची सरासरी (एलपीए) 87 सेमी आहे. SEFS अंदाजावर आधारित संपूर्ण देशभरातील हंगामी (जून ते सप्टेंबर) पावसासाठी पाच श्रेणी संभाव्यता अंदाज खाली दिले आहेत, जे मान्सूनच्या हंगामी पावसाची सर्वाधिक संभाव्यता (एलपीए च्या 96 104% ) असण्याची शक्यता सूिचत करतात.

 

 

मल्टी मॉडेल एन्सेम्बल (MME) अंदाज प्रणालीवर आधारित अंदाज 3 2022 नैऋत्य मोसमी पावसाचा MME अंदाज तयार करण्यासाठी, एप्रिलची सुरुवातीची पारिस्थती वापरली गेली आहे. भारतीय मान्सून प्रदेशातील सर्वोच्च कौशल्य असलेल्या हवामान मॉडेलमधील सर्वोत्कृष्ट मॉडेल्सचा वापर मल्टी-मॉडेल अंदाज तयार करण्यासाठी केला गेला आहे. MMCFS हे MME अंदाज मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चार मॉडेलपैकी एक आहे. MME अंदाज असे सुचवितो की 2022 च्या मान्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) संपूर्ण देशभरातील मान्सूनचा पाऊस सामान्य (LPA च्या 96-104% ) असण्याची शक्यता आहे. 1971-2020 या कालावधीसाठी संपूर्ण देशभरात जून ते सप्टेंबर या कालावधीतील पावसाची दीर्घ कालावधीची सरासरी (एलपीए) 87 सेमी आहे.

 

 

 

मोसमी पावसासाठी (जून ते सप्टेंबर) टर्साइल (tercile) श्रेर्णीसाठी (सामान्यपेक्षा जास्त, सामान्य आणि सामान्यपेक्षा कमी) संभाव्य अंदाजांचे अवकाशीय वितरण चित्र.1 मध्ये दाखवले आहे. वितरणावरून असे सूचित होते की द्वीपकल्पीय भारताच्या उत्तरेकडील भाग आणि लगतच्या मध्य भारताच्या अनेक भागांमध्ये, हिमालयाच्या पायथ्याशी आणि वायव्य भारताच्या काही भागांमध्ये सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त मोसमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ईशान्य भारत, उत्तर भारत आणि दक्षिण दवीपकल्पाच्या दक्षिण भागात काही भागात सामान्य ते सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. जमिनीच्या क्षेत्रातील पांढरे छायांकित क्षेत्र हवामानविषयक संभाव्यता दर्शवतात.

 

 

 

विषुववृत्तीय प्रशांत आणि हिंद महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान (SST) स्थिती सध्या, विषुववृत्तीय प्रशांत महासागरावर ला निनाची परिस्थती आहे. MMCFS मॉडेलचा अदयावत तसेच इतर हवामान Climate मॉडेलचा अंदाज सूचित करतो की ला-निना परिस्थती येणाऱ्या पावसाळ्यात कायम राहण्याची शक्यता आहे. सध्या हिंद महासागरावर तटस्थ Neutral इंडियन ओशन डायपोल (आय.ओ.डी. IOD) पारिस्थती आहे आणि MMCFS मॉडेलचा अदयावत अंदाज सूचित करतो की नैऋत्य मान्सून हंगामाच्या सुरुवातीपर्यंत तटस्थ आय.ओ.डी स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर, ऋण negative आय.ओ.डी. स्थितीची वाढीव संभाव्यता वर्तवली जाते. प्रशांत आणि हिंद महासागरावरील समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानाचा (SST) भारतीय मान्सूनवर जोरदार प्रभाव असल्याचे ओळखले जाते, म्हणून IMD या महासागरावरील समुद्राच्या पृष्ठभागाच्या स्थितीवर लक्ष ठेवून आहे..

Local ad 1