पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी प्रवीण कोरंगटीवार यांच्या अँटी चेंबरमध्ये पैशांचे बंडल ठेवल्याने एकच खळबळ उडाली होती. तर्क-वितर्क लावले जात होते. या प्रकरणात बंडगार्डन पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी रात्री उशिरा पंचनामा करून पैसे ताब्यात घेतले. (The bundle kept in the anti-chamber of the social welfare officer is worth lakhs)
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत दलित वस्तीतील विविध प्रकारची सहा कामे केली जातात. त्यात वीज, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता गृह या प्रमुख कामांचा समावेश आहे. दलित वस्तीचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायतिकडून विकास आराखडे मागवले जातात. तसेच अनेक सरपंच गटविकास अधिकारी कार्यालयात कामांचा प्रस्ताव सादर करून समाजकल्याण कार्यालयात पाठपुरावा करतात. (The bundle kept in the anti-chamber of the social welfare officer is worth lakhs)
Foreign liquor। विदेशी दारू स्वस्त का केली ; उत्पादन शुल्क विभागाचे स्पष्टीकरण
शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास धक्कादायक प्रकार घडला आहे. पुणे जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी प्रवीण कोरंगटीवार यांना लाच देण्याचा प्रयत्न झाला . सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कोरंगटीवार यांच्या दालनात दोन व्यक्ती आले, त्यांनी कामे मंजूर करून द्या, तुमचं काही असेल तर दिलं जाईल, असे सांगितलं. परंतु कोणताही काम करण्यासाठी पैसे देण्याची गरज नाही. नियमानुसार काम केलं जाईल, असे सांगीतले. मात्र, अलेला एक व्यक्ती काही बोलण्याच्या आत अँटी चेंबरमध्ये जाऊन परत आला. त्यामुळे काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आले. त्यामुळे मी बाहेर पडलो असे कोरंगटीवार यांनी सांगितले. (The bundle kept in the anti-chamber of the social welfare officer is worth lakhs)
पुणे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकाऱ्याच्या अँटी चेंबरमध्ये ठेवले पैशांचे बंडल
दरम्यान, ही बाब प्रसार माध्यमांमध्ये पसरली. दुपारी अँटी चेंबरमध्ये पैसे ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसात तक्रार देण्यात आली. घटनास्थळी पोलिसांनी दाखल होऊन पैसे ताब्यात घेतले. 500 रुपयांचे दोन बंडलमध्ये एक लाख रुपये असल्याचे समोर आले. (The bundle kept in the anti-chamber of the social welfare officer is worth lakhs)