Talathi Recruitment 2023 । तलाठी भरती संदर्भात मोठी अपडेट ; परिक्षा कधी होणार ?

Talathi Recruitment 2023 । राज्यात तलाठी भरती होणार असून, त्यासंदर्भात मोठी अपडेट आली आहे. परिक्षा कधी आणि कशी होणार याविषयी उमेदवारांमध्ये उत्सुकता आहे.  तलाठी भरती संदर्भात आता मोठा अपडेट आली असून, परिक्षा कधी होणार आणि प्रश्न पत्रिका कशी असेल, याविषी माहिती समोर येत आहे. (Talathi Recruitment Big Update; When will the exam be held?)

 

 

राज्यात सुमारे 4 हजार 464 तलाठ्यांच्या पदांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी घेण्यात येणार्‍या परीक्षेकरिता प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका न काढता संपूर्ण एकच प्रश्नपत्रिका काढली जाईल,अशी माहिती सुत्रांनी दिली. एका परीक्षार्थी उमेदवाराला एकाच जिल्ह्यात अर्ज करून परीक्षेमध्ये भाग घेता येणार आहे.

 

 

 

राज्य शासनाने तलाठी संवर्गातील क गटातील पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यास परवानगी दिली आहे. तलाठी भरती संदर्भातील प्रारूप  जाहीर करण्यात आले. राज्यात एकूण चार हजार 464 तलाठ्यांची पद रिक्त असून, त्यासाठी ही भरती होणार आहे. राज्याच्या जमाबंदी आणि भूमी अभिलेख विभागाने येत्या 20 जून पासून भरतीसाठी लिंक खुली करण्याकरिता राज्य शासनाकडे परवानगी मागितली आहे. लिंक खुली झाल्यानंतर उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज भरता येतील.

 

आजपर्यंत घेण्यात आलेल्या तलाठी भरती परीक्षेमध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका काढून परीक्षा घेण्यात आली होती. यावेळी भूमी अभिलेख विभागाने भरती आणि परीक्षेची कार्यवाही करण्याचे काम टीसीएस कंपनीला दिले आहे. तलाठी भरतीसाठी घेण्यात येणार्‍या परीक्षेकरिता अभ्यासक्रम निश्चित केला असून, संपूर्ण राज्यातील परीक्षार्थींसाठी एकच प्रश्नपत्रिका असेल. खुल्या प्रवर्गासाठी एक रुपये तर आरक्षित प्रवर्ग करताना 900 रुपये परीक्षा फी असणार आहे.

 

आदिवासी क्षेत्र असलेल्या बारा जिल्ह्यांमध्ये पेसा अंतर्गत आदिवासी उमेदवारांकरता लोकसंख्येवर आधारित आरक्षित जागा असतील. भरती परीक्षा करता लिंक ओपन झाल्यावर नोंदणी करता 21 दिवसांचा मुदत कालावधी असेल. 17 ऑगस्ट किंवा 12 सप्टेंबर या दिवशी परीक्षा घेण्याची तयारी दाखवण्यात आली आहे. (Talathi Recruitment Big Update; When will the exam be held?)

Local ad 1