Talathi Bharti 2023 । ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक कधी ओपन होणार ?

MHTimes Exclusive News । तलाठी भरतीसंदर्भात (Talathi Bharti 2023) महत्वाची बातमी समोर आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक तयार (Link ready to apply online) झाली असून, त्यात किरकोळ दुरुस्ती करायची आहे. ते पुर्ण झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक ओपन होईल, (Talathi Bharti 2023 Apply Online) अशी माहिती जमाबंदी आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी mhtimes.in सोबत बोलताना दिली.

 

 

 

कंप्युटर बेस्ड टेस्ट परीक्षा

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण 4 हजार 644 पदांच्या सरळसेवा भरती केली जाणार आहे. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य) कार्यालयाकडून राज्यातील एकूण 36 जिल्हाच्या केंद्रावर ऑनलाइन (Computer Based Test Examination) परीक्षा घेतली जाणार आहे. या परिक्षा घेण्याचे काम खासगी कंपनी देण्यात आले आहे.

 

 

अधिकृत घोषणा केली जाणार

पदभरती प्रक्रिया राबविण्याकरीता सामान्य प्रशासन विभागाच्या 4 मे 2022 आणि 21 नोव्हेंबर 2022 च्या शासन निर्णयामधील तरतूदी व मार्गदर्शक सूचनांनुसार पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. अर्ज स्वीकारण्यासाठी लिंक तयार करण्यात आली आहे. पदभरतीचे प्रगटन प्रसिद्ध केले जाणार असून, ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यासाठी लिंक लवकरच सुरु होणार आहे. ही लिंक सुरु करण्यापुर्वी अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

 

 

तलाठी भरतीसाठी कक्ष

महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील पदांच्या सरळसेवा भरतीच्या जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), नवीन प्रशासकीय इमारत दुसरा मजला, पुणे या ठिकाणी ‘तलाठी भरती कक्ष’ सुरु करण्यात आलेला आहे. अर्ज करण्यापुर्वी एकदा वाचा सदर तलाठी भरतीसाठी सामान्य नागरिकांसाठी व प्रक्रियेमध्ये सहभागी होणार्‍या उमेदवारांसाठी सूचना https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे राज्याचे अप्पर जमाबंदी आयुक्त तथा अतिरिक्त संचालक भूमि अभिलेख आनंद रायते यांनी कळविले आहे.

Local ad 1