काय बोलता ! राज्यात कोरोनाची सव्वासहा हजार रुग्ण आढळले

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे एकीकडे मास्क सक्ती करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. तर दुसरीकडे राज्यात रविवारी 6 हजार 493 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात एकूण 6213 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. (Six and a half thousand corona patients were found in the state)

 

 

 

राज्यात बीए 5  व्हेरीयंट आणि बीए 4 व्हेरीयंटचे पाच रुग्ण आढळले आहेत.  या रुग्णांमध्ये तीन पुरूष आणि दोन स्त्रिया आहेत. राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बी ए 5 आणि बी ए. 4 रुग्णांची संख्या 54 झाली आहे. यातील 15 पुण्यातील, मुंबईतील 33, नागपूरमधील चार आणि ठाण्यातील दोन रुग्ण आहेत. (Six and a half thousand corona patients were found in the state)

 

 

राज्यात आज पाच कोरोनाबाधित रुग्णाने आपला जीव गमवाला. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा 1.85 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 77,90,153 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.83 टक्के इतका झालं आहे.(Six and a half thousand corona patients were found in the state)

Local ad 1