पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि कचरा बाजूला केला : आदित्य ठाकरे

Maharashtra Political Crisis : पावसाळ्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेची सवय आहे. आम्ही रस्त्यावरचा कचरा बाजूला काढून टाकतो. नालेसफाई करत असतो, नद्यांमधला जो गाळ असतो तो बाजूला करतो आणि मग जे काही दिसत ते चांगलं दिसतं. तसं हे आपलं पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि कचरा बाजूला करण्याचे काम झाले आहे, अशा शब्दांत बंडखोर आमदारांना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी फटकारले. (Sanitation and garbage disposal before monsoon: Aditya Thackeray)

 

आदित्य ठाकरे म्हणाले 20 जूनला जेव्हा त्यांनी बंड केले तेव्हा काही फुटीरवादी आमदार पळवले आणि काही जण फसले. अजून 15-20 लोक आमच्या संपर्कात आहेत. मलाही फोन करतात. आपल्या शिवसैनिकांना फोन करत आहेत की, कसे ही करून येथून आम्हाला घेऊन जा. पण गुवाहाटीला गेल्यानंतर त्यांची कैदी असल्यागत परिस्थिती झाली आहे. यावर बोलताना ठाण्यापासून सुरुवात करायची झाली, तर बंड करायचा होता… हिम्मत इतकी होती, जे स्वतःला आम्ही मोठे नेते आहोत असे समजत होते. त्यांना असे वाटते ते दादागिरी करू शकतात, ते काही करू शकतात. दादागिरी तुम्ही सामान्य माणसावर कराल, पण दादागिरीने तुम्ही मन नाही जिंकू शकत. लोकांना नाही जिंकू शकत. (Sanitation and garbage disposal before monsoon: Aditya Thackeray)

 

 

 

 भाजप अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत

भाजप सध्यातरी वेट अँड वॉच या भूमिकेत असून, अद्याप सरकार स्थापनेचा किंवा कोणत्या पक्षासोबत जाण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शिंदे गटाकडून कोणताही प्रस्ताव भाजपला आला नसल्याची माहिती भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर बोलत होते. (Sanitation and garbage disposal before monsoon Aditya Thackeray)

Local ad 1