“या” दिवशी दुय्यम निबंधक कार्यालय सुरु राहणार
नांदेड : जनतेच्या सोयीसाठी दस्त नोंदणी तसेच इतर कार्यालयीन कामासाठी शनिवारी (26 मार्च) आणि रविवारी (27 मार्च) शासकीय सुट्टीच्या दिवशी सह दुय्यम निबंधक वर्ग-2 कार्यालय नांदेड क्र. 1 व 2 तसेच दुय्यम निबंधक श्रेणी-1 नांदेड क्र. 3 सुरु असणार आहे, अशी माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी वि. प्र. बोराळकर (Stamp Collector v. p. Boralkar) यांनी दिली. (The secondary registrar’s office will continue on this day)
Related Posts
ज्या पक्षकारांनी 31 मार्च 2022 पर्यंत दस्त निष्पादित करुन, सही करुन शासकीय ई-चलन मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्कचा भरणा करुन ठेवल्यास त्यांचे दस्त पुढील चार महिण्यापर्यत नोंदणीसाठी विनादंड स्विकारण्यात येतील. वार्षिक मुल्यांकन दरवाढ झाल्यास संबंधितास अतिरिक्त भुर्दड बसणार नाही. त्यामुळे पक्षकारांनी दस्त नोंदणीसाठी कार्यालयात अनावश्यक गर्दी न करता ई-स्टेपइनचा वापर करुन दिलेल्या निर्धारित वेळेत आपल्या दस्ताची नोंदणी करावी व गैरसोय टाळावी असे कळविले आहे. (The secondary registrar’s office will continue on this day)