MhTimes Exclusive News। गावातील रेशन दुकानातून मिळणार आता वायफाय सुविधा – PM WANI YOJANA

MhTimes Exclusive News । आजकाल प्रत्येकजण मोबाईलमध्ये (Mobile) डोक घालून बसलेलं दिसून येतं. त्याच कारणही तसंच आहे. इंटरनेट सेवा (Internet service) सर्वसामान्यांना परवडतील, अशा दरात मिळते. परंतु इंटरनेच्या अती वपारने ते मध्येच संपते. मात्र, आता घाबरायची गरज नाही. कारण केंद्र शासनाने PM WANI YOJANA आणली आही, तुम्ही म्हणाल हे काय नवीन, हो खरच हे नवीन आहे. हे जाणून घेण्यासाठी संपर्ण बातमी वाचा.. (Village ration shop will now get wifi facility – PM WANI YOJANA)

 

 

केंद्र आणि राज्य सरकारने प्रत्येक रेशन दुकानंवर नागरी सुविधा केंद्र (Common Civic Center) (सीएससी) पोर्टल आणि पीएम वाणी ( PM WANI YOJANA ) योजनेंतर्गत माफक दरात इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

 

 

उत्पंंन्न वाढीमुळे पुणे विभागातील अनेक रेशन दुकानदारांनी या सुविधेसाठी नोंदणी केलेली असताना जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि नियोजनाअभावी कुठल्याच दुकानावर सुविधा सुरू नसल्याचे वास्तव समोर आले आहे.

 

PM WANI YOJANA

राज्यांमधील स्वस्त धान्य दुकानांमध्ये पीएम वाणी योजनेंतर्गत इंटरनेट सुविधा प्रदान करण्यासाठी पुणे विभागातील पाचही जिह्यांसह पालघर आणि सिंधुदूर्ग या जिह्यांना ‘सार्वजनिक डेटा कार्यालय’ (‘Public Data Office’) म्हणून राज्य सरकारने मान्यता दिली. तसेच सर्व रेशन दुकानात सातबारा, पिक विमा, नोंदणी किंवा इतर शासकीय सेवा सुविधा देेणारे नागरी सुविधा केंद्र सुरु करण्याचे धोरण आखले. या योजना, सुविधा दुकानदारांसाठी ऐच्छिक असल्या, तरी पुणे विभागात तीन हजार ५०८ रेशन दुकानदारांनी नागरी सुविधा केंद्रांसाठी नोंदणी केली. तर, ७५ दुकानदारांनी पीएम वाणी योजनेंतर्गत इंटरनेट वायफाय सुविधेचे उपकरण (राऊटर) खरेदी करून ठेवले आहे.

 

Rain forecast । राज्यात ‘या’ जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा ; जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना

 

प्रशासनाकडून मार्गदर्शन, प्रशिक्षण देण्यात आलेले नसून इंटरनेट सुविधेबाबत आर्थिक गुंतवणूक करूनही कुठलेच मार्गदर्शन नसल्याने रेशन दुकानदारच प्रतिक्षेत आहे. मागील सहा महिन्याच्या कालावधीनंतर केवळ सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिह्यात प्रशिक्षण संगणक तज्ज्ञ आणि इतर जाणकार व्यक्तींमार्फत प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे.

Local ad 1