...

पुणे विद्यापीठाचे NIRF रँकिंग घसरले ; युवासेनेची व्यवस्थापन परिषदेच्या राजीनाम्याची मागणी

पुणे : नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) २०२५ जाहीर झाले असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा क्रमांक मोठ्या प्रमाणात घसरला आहे. मागील वर्षी ३७व्या स्थानावर असलेले हे विद्यापीठ यंदा थेट ९१व्या स्थानावर गेले आहे. ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ म्हणून ओळखले जाणारे हे विद्यापीठ रँकिंगमध्ये मागे पडल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षणप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

 

पुण्यात महिला पत्रकाराचा विनयभंग ; ढोल-ताशा पथकाच्या सदस्यांवर गुन्हा दाखल 

 

या घसरणीची संपूर्ण जबाबदारी विद्यापीठाच्या अधिकार मंडळावर असल्याचा आरोप करून व्यवस्थापन परिषद व अधिसभा सदस्यांनी सामूहिक राजीनामे द्यावेत, अशी मागणी युवा सेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी केली आहे. “प्रशासन प्राध्यापकांचा अभाव दाखवून जबाबदारी झटकत आहे. परंतु, प्रत्यक्षात गैरव्यवस्थापन आणि अंतर्गत वाद हेच रँकिंग घसरण्याचे कारण आहे,” असे यादव यांनी सांगितले.

 

 

“सर्व व्यवस्थापन परिषद व अधिसभा सदस्यांनी राजीनामे द्यावेत, विद्यापीठाच्या विकासासाठी इच्छाशक्ती असलेल्यांना संधी द्यावी. कुलगुरूंनी घसरत्या गुणवत्तेकडे तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा गरीब घरातील विद्यार्थी आक्रमक आंदोलन उभारतील आणि युवासेना आघाडीवर असेल,” असा इशारा यादव यांनी दिला.

 

अंतर्गत वाद आणि अडथळे

युवासेनेच्या मते, उद्योगपती सायरस पूनावाला यांनी दिलेले २०० कोटी रुपयांचे कन्व्हेन्शन सेंटर अंतर्गत वादांमुळे रखडले आहे. कुलसचिव पदाच्या नियुक्तीवरून दीर्घकाळ संघर्ष सुरू राहिला आणि त्यातून विद्यापीठाची प्रतिमा मलिन झाली.

 ऐतिहासिक घसरण

काही वर्षांपूर्वी १६व्या क्रमांकावर असलेले पुणे विद्यापीठ आता सिंबायोसिससारख्या अभिमत विद्यापीठांच्या जवळपासही दिसत नाही, ही लाजीरवाणी बाब असल्याचे युवासेनेने स्पष्ट केले.

Local ad 1