पुण्यातील वाहतूक कोंडीवर दीर्घकालीन उपाययोजना करा – बाबुराव चांदेरे
्
पुणे, १६ सप्टेंबर २०२५ : पुण्यातील वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी पुणे महानगरपालिकेचे मा. स्थायी समिती अध्यक्ष आणि बाणेर-बालेवाडी-सूस-म्हाळुंगे परिसराचे प्रतिनिधी बाबुराव चांदेरे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची पुण्यातील जेडब्ल्यू मॅरीएट येथे विशेष भेट घेतली. या भेटीत चांदेरे यांनी परिसरातील नागरिकांच्या वतीने निवेदन सादर करून वाहतुकीच्या समस्यांवर चर्चा केली. त्यांनी दीर्घकालीन उपाययोजनांसाठी चार प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. त्यात मर्सिडीज बेंझ शोरूमजवळ भुयारी मार्ग, बिटवाईज कंपनीजवळ उड्डाणपूल, सुमनकीर्ती मारुती सुझुकी शोरूमजवळ उड्डाणपूल आणि वाकड–सुसखिंडपर्यंतच्या सर्व्हिस रोडचा विकास करा, अशी मागणी केली आहे.
गडकरी यांनी या निवेदनावर तातडीने प्रतिसाद देत नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाचे वरिष्ठ प्रोजेक्ट डायरेक्टर संजय कदम यांची नियुक्ती केली. याशिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत देहूपासून कात्रजपर्यंत स्वतंत्र कॉरिडॉर उभारण्याचे आश्वासन ही गडकरींनी दिले. हा कॉरिडॉर पुण्यातील वाहतूक कोंडी संपुष्टात आणणारा ऐतिहासिक निर्णय ठरणार असून, यामुळे प्रवास सुलभ, सुरक्षित होईल, वेळेची बचत होईल तसेच प्रदूषणात मोठी घट होईल.
Waqf Amendment Act 2025 । तीन तरतुदींवर स्थगिती, मिस फरहा फाउंडेशनची महत्वाची भुमिका
“नागरिकांच्या वतीने मांडलेल्या निवेदनाला मिळालेला गडकरी साहेबांचा सकारात्मक प्रतिसाद हा पुणेकरांसाठी दिलासादायक आहे. देहू–कात्रज कॉरिडॉर हा पुण्याच्या विकासाला नवे बळ देणारा ऐतिहासिक प्रकल्प ठरेल.” — बाबुराव चांदेरे, माजी स्थायी समिती अध्यक्ष, पुणे महानगरपालिका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसा यांनी स्पष्ट केले कुणबी प्रमाणपत्र मिळणार ?